आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bal Thackeray’S First Death Anniversary Latest News Photos

बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज ठाकरे आलेच नाहीत, कुटुंबात संघर्ष पेटणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी ठाकरे कुटुंबियात आणखीही काही मुद्यांवर फूट असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. बाळासाहेबांचे पुतणे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या राजकीय गुरुला आदरांजली वाहण्यासाठी गेले नाहीत. तर, दुसरीकडे बाळासाहेबाचे थोरले सुपुत्र जयदेव यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाला विरोध केला आहे. नुसते स्‍मारक उभे करून काय फायदा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ठाकरे परिवारात गेल्या काही वर्षापासून असलेली फूट कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज ठाकरेंचा कृष्णकुंज बंगला शिवाजी पार्कच्या मैदानापासून जवळच आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योग मंत्री नारायण राणे सहित काँग्रेसचा एकही नेता शिवाजी पार्कवर दिसला नाही. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. पण मोदींची बंगळुरुमध्ये भव्य रॅली असल्याचे सांगत प्रदेश नेत्यांनी तेथे हजेरी लावली.
गेल्या काही दिवसापासून वादात अडकलेले मनोहर जोशींनी मात्र शिवाजी पार्कवर हजेरी लावली. त्यावेळी ते उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्याशी संवाद साधताना दिसले.
पुढे वाचा, ठाकरे कुटुंबातील फूट वाढणार?