आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावात त्याच्याच पंटर्सची केली घुसखोरी; या पत्रकाराने केला आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबई, औरंगाबाद आणि दिल्ल्तील्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. मात्र, या लिलावात दाऊदच्या पंटर्स अर्थात हस्तकांनीच घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप पत्रकार एस. बालकृष्णन यांनी केला आहे.

दरम्यान, दाऊदच्या भोवतीचा फास घट्ट आवळण्यासाठी, केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परदेशी विनिमय नियंत्रकांनी या लिलावासंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. 14 नोव्हेंबर 2017 ला दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी 5 कोटी 54 लाखांची मूळ किंमत ठेवण्यात आली आहे.
 
यापूर्वीही दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांदा जाहिरात काढण्यात आली आहे. केंद्र सरकारने दाऊदच्या दुबईतल्या आणि लंडनमधल्या मालमत्तेवरही याआधीच टाच आणली आहे.

लिलावात या या संपत्तीचा समावेश..
- मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील दमरवाला इमारत
- सध्या या इमारतीत दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर राहतो.
- दुबईला जाण्यापूर्वी दाऊद याच परिसरात राहत होता.
- दाऊदची आई अमिना बी यांनी ही इमारत 1980 मध्ये विकत घेतली होती.
- मोहम्मद अली रोडवरील शबनम गेस्ट हाऊस
- माझगावातील पर्ल हार्बर इमारतीतील एक फ्लॅट
- सैफी ज्युबिली स्ट्रीटवरील दादरीवाला चाळीतील एका खोलीचे भाडेकरार अधिकार
- औरंगाबादमधील 600 चौरस फूट फॅक्टरीचा प्लॉट

पुढील स्लाइड्‍वर क्लिक करून वाचा.. पत्रकार एस. बालकृष्णन यांनी हॉटेल रौनक अफरोझसाठी लावली होती सर्वाधिक बोली...
 
बातम्या आणखी आहेत...