आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांचा स्मृतिदिन: शिवतीर्थावर अलोट गर्दी, उद्धव ठाकरेंकडून आदरांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेबांना आदरांजली वाहताना मुख्यमंत्री फडणवीस... - Divya Marathi
बाळासाहेबांना आदरांजली वाहताना मुख्यमंत्री फडणवीस...
मुंबई- मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतिदिन. बाळासाहेबांना मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो ठाकरेप्रेमी व शिवसैनिकांनी शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर अलोट गर्दी उसळली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साडेआकराच्या सुमारास शिवतीर्थावर दाखल होत बाळासाहेबांना सहकुटुंब आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना आदरांजली अर्पित केली. त्यांच्यासमवेत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर काही भाजपचे मंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते. त्यामुळेच बाळासाहेबांना कार्यकर्त्यांमध्ये कायमच आदराचे स्थान होते अशा शब्दांत मोदींनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.
अमोघ वक्तृत्वाचे धनी, परखड लेखक,महान व्यंगचित्रकार, शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत नमन! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेबांना तृतीय पुण्यतिथी निमित्त 'मानाचा मुजरा'.. शेवटपर्यंत अविस्मरणीय.. अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडेंनी बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही ट्विटरमार्फत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. 'महाराष्ट्र की राजनीति को नई दिशा देने वाले, हिन्दू हृदय सम्राट, महाराष्ट्र के शेर, श्रद्धेय बालासाहेब ठाकरे को पुण्यतिथि पर श्रद्धांजलि' अशा शब्दांत शिवराज सिंह चौहान यांनी आदरांजली वाहिली आहे.
पुढे पाहा, कोणी कोणी वाहिली बाळासाहेबांना आदरांजली...