आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray And Swatyantraveer Savarkar Statue In Maharashtra Sadan

'बाळासाहेब ठाकरे, सावरकरांचा पुतळा महाराष्ट्र सदनात बसवा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे बसवावेत, अशी मागणी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवून केली आहे.

महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्यासह दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरही महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणामध्ये हवेच होते.

भविष्यात सावरकरांचा सन्मान प्रांगणात होईल याची खात्री आहे. मात्र, ज्यांच्यामुळे भुजबळ हे नाव उदयास आले आणि महाराष्ट्राबरोबर ओबीसी म्हणून देशात चमकले त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्याचे काम आपल्यासारख्या हिंमतबाज माणसाकडून का घडले नाही, असा प्रश्नही त्यांनी भुजबळ यांना विचारला आहे. तसेच लोकमान्य टिळकांना आपण कसे विसरलात, असाही प्रश्नही आमदार रावते यांनी पत्रात विचारला आहे.