आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कवर गर्दी, स्मृतिस्थळावर आजपासून अखंड ज्योत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच राज्यभरातील शिवसैनिक शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेत आहेत. दरम्यान, आजपासून शिवसैनिक आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी अखंड ज्योत प्रज्वलित होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी साडेसहा वाजता ही प्रेरणाज्योत शिवसैनिकांच्या उपस्थितीत प्रज्वलित करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वतीने मुंबईसह राज्यभर शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीरापासून ते नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्यापर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शिवसेनाप्रमुखांचे शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळ हे शिवसैनिकांसह तमाम मराठी लोकांसाठी शक्तिस्थळच बनले आहे. या स्मृतिस्थळावरून महाराष्ट्राच्या जनतेला अखंड प्रेरणा मिळावी म्हणून मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन महानगर गॅस आणि भारत पेट्रोलियमच्या सहकार्याने ज्योत उभारली आहे. ही ज्योत अखंडपणे तेवत राहणार आहे.
षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा- माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी
4 वाजता शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ‘सावरकर ते बाळासाहेब : दोन हिंदुहृदयसम्राट’ या विषयावर अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच ‘मँचेस्टर गार्डियन’ या गाजलेल्या दैनिकाच्या पत्रकार ताया झिंकीन लिखित ‘रिपोर्टिंग इंडिया’ या पुस्तकाचा अनुवाद साप्ताहिक ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी केला आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
बाळासाहेबांच्या आयुष्यावरील बाळकडू 500 चित्रपटगृहात प्रदर्शित- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर आधारित ‘बाळकडू’ हा मराठी सिनेमा आज राज्यभर सुमारे 500 चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. काल सायंकाळी या चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रीमियर शो लोअर परळच्या फिनिक्स ‘पीव्हीआर’मध्ये झाला. यावेळी राजकीय-सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत उपस्थित होते.
नेपाळच्या चित्रकाराने बाळासाहेबांच्या रेखाटलेल्या 101 भावमुद्राचे चर्चगेट प्रदर्शन, वाचा पुढे...