आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Birthday Today BJP And Shivsena Alliance In 1995 At Maharashtra

19 वर्षांपूर्वी बनले होते युतीचे सरकार, बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता रिमोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: 1995 च्या विधानसभा निवडणूकीत युतीला यश मिळाल्यानंतर घेतलेल्या सभेत बोलताना बाळासाहेब ठाकरे)

मुंबई - महाराष्ट्रात 1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या युतीला विजय मिळाला होता. या निवडणूकीत शिवसेनेला 73 आणि भाजपाला 65 जागा मिळाल्या होत्या. या युतीच्या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि भाजपाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. आता तब्बल 19 वर्षांनंतर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा सरकार स्थापन झाले आहे.

भाजपा-शिवसेना दोघांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते. तसे पाहायला गेले तर, भाजपा-शिवसेना या दोघांनी मिळून सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच संधी होती. या सरकारला रिमोटवर चालणारे सरकार असा आरोपही करण्यात आला होता. कारण शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच हे सरकार सर्व निर्णय घेत होते. बाळासाहेब बाहेर राहूनसुध्दा संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करत होते.

दोन वेळा बदलले मुख्यमंत्री
भाजपा-शिवसेनेच्या सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून दोनवेळा मुख्यमंत्री बदलण्यात आले. जेव्हा युतीमध्ये सरकार बनले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यानंतर 1999 मध्ये मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते.

मातोश्रीवर व्हायचे महत्त्वाचे निर्णय
भाजपा-शिवसेनेच्या युती सरकारच्या अनेक बैठकी बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर होत असे. याच गोष्टीचा काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी विरोध केला होता.

पुढील स्लाईडवर पाहा, 1995 च्या युतीसरकारचे फोटो...