आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Granddaughter Marries Muslim Guy Rumou

बाळासाहेबांच्‍या नातीचा फोटो पाकिस्तानमध्‍ये VIRAL, \'मुस्लिम युवकासोबत\' जोडले नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्‍नादरम्‍यान बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. - Divya Marathi
लग्‍नादरम्‍यान बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे.
मुंबई - येथील शिवाजी पार्क मैदानावर उद्या (विजयादशमी) शिवसेनेची सुवर्ण महोत्‍सवी सभा होणार आहे. दरम्‍यान, अनेक करणामुळे सध्‍या शिवसेना चर्चेत आहे. त्‍यामुळे उद्या होणाऱ्या सभेक‍डे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्‍य उपस्‍थ‍ित असतात. त्‍या अनुषंगाने आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत बाळासाहेब ठाकरे यांची नात नेहा यांच्‍या लग्‍नाचा फोटो पाकिस्‍तानमध्‍ये का व कसा वायरल झाला होता, याची खास माहिती...
नेहा आहे ज्‍वेलरी डिजाइनर
नेहा ही बाळासाहेबांचे सर्वांत लहान पुत्र बिंदू माधव यांची मुलगी आहे. ती ज्वेलरी डिजाइनर आहे. तिच्‍या लहानपणीच एका अपघातात बिंदू माधव यांचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे तिच्‍या आईने तिला आणि तिचा भाऊ निहार यांना घेऊन मातोश्री सोडले.

पाकिस्तानमध्‍ये वायरल झाला होता लग्‍नाचा फोटो
शिवसेनेचा पाकिस्‍तानला विरोध सर्वश्रुत आहे. पण, बाळासाहेबांची नात नेहा ही पहिल्‍यादा पाकिस्‍तानमुळेच देशभर चर्चेत आली होती. एवढेच नाही तर तिच्‍या लग्‍नचा फोटो पाकिस्‍तानात वायलर झाला होता. पाकिस्तानमध्‍ये सोशल मीडियावर अशी अफवा उडाली होती की, नेहा हिने एका मुस्‍लीम युवकासोबत पळून जावून लग्‍न केले. त्‍यामुळे बाळासाहेब ठाकरे प्रचंड नाराज झाले असून, ते आपल्‍या नातीच्‍या लग्‍नात गेले नाहीत. मात्र, हे प्रकरण या उलट होते. त्‍यावर ठाकरे कुटुंबीयांनी खुलासाही दिला. प्रत्‍यक्षात नेहा हिने मुस्‍लीम नव्‍हे तर हिंदू गुजराथी मुलासोबत लग्‍न केले होते.
नेहाचे पती आहेत डॉक्टर
मनन ठक्कर हे नेहाचे पती असून, ते मुंबईतील प्रसिद्ध डॉक्‍टर आहेत. त्‍यांचे मुंबईतील फाइव्‍ह स्टार हॉटल ताज लॅड अॅड्समध्‍ये 4 डिसेंबर 2011 ला नेहासोबत त्‍यांचे लग्‍न झाले. मनन यांचे वडील निपुभाई ठक्कर हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा नेहा यांच्‍या लग्‍नाचे काही निवडक PHOTOS....