आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांचे स्मारक : महापौर बंगल्याला राज यांचा विरोध, म्हणाले जागेवर डोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यातच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. मात्र, मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन महापौर बंगल्‍यातील जागा कमी असल्‍याचे सांगत सरकारवर आरोप केला आहे. बाळासाहेबांच्‍या नावाखाली महापौर बंगल्‍यावर डोळा ठेवण्‍याचा हा प्रयत्‍न आहे. राज्य सरकार बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मोठी जागा का देत नाही? असा प्रश्‍न उपस्‍थित करत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोध दर्शवणार असल्‍याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत काय म्‍हणाले राज ठाकरे
- स्मारकाबद्दल माझ्या काही कल्पना आहेत. एखाद्या व्यक्तीचे स्मारक बनवताना त्यातून काहीतरी शिकवण मिळाली पाहिजे.
- बाळासाहेबांचे स्मारक हे त्यांना साजेसे असले पाहिजे.
- मुंबईमध्‍ये बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा का मिळत नाही?
- बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईत अनेक पर्याय आहेत.
-स्मारकावरून शिवसेना विनाकारण वाद निर्माण करत आहे.
-दादरच्या म्युन्सिपल क्लबची जागी मोठी आहे, तेथे बाळासाहेबांचे स्मारक व्हावे.
-मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महापौर बंगल्यात होणाऱ्या स्मारकाला विरोध करणार.
-राज्यात आणि केंद्रात तुमची सत्ता असूनही बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य, मोठी आणि उत्तम जागा का मिळू शकत नाही?
-आज सत्ता आहे म्हणुन महापौर निवासात स्मारक बांधत आहात, उद्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यात किंवा राष्ट्रपती भवनात अशी स्मारकं उभारणार का?