आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Memorial Near Shivaji Park Chief Secreatary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कजवळच! मुख्य सचिवांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने शिवाजी पार्कच्या जवळ म्हणजे महापौर बंगल्यालगतची जागा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दै. 'दिव्य मराठी'ला ही माहिती दिली. दुसरीकडे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मात्र जागेचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे म्हटले.

जागा ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीने ६ जागा निवडल्या होत्या. यातील दोन जागा निश्चित करण्यात आल्या. एक जागा महापौर बंगल्याजवळची आहे. समितीने जागेचा अंतिम निर्णय शुक्रवारीच बंद लिफाफ्यात मुख्य सचिवांच्या स्वाधीन केला. मुख्य सचिव पालिका आयुक्त अजोय मेहता यांना हा निर्णय पाठवतील. तेथून तो अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर जागा ताबा घेण्याचे काम सुरू होईल.