आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Memorial, Opposition Oppose For Mayor House

स्मारकाचा वाद मुंबई महापालिकेतही पेटला, विरोधकांनी सुचवला \'मातोश्री\'चा पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगला नाही तर साहेबांचे वास्तव्य राहिलेला मातोश्री बंगलाच योग्य असल्याचे मत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षांनी मांडले आहे. बाळासाहेबांबद्दल आम्हालाही प्रचंड आदर आहे मात्र त्यांचे स्मारक महापौर बंगल्यात नव्हे तर भव्य जागेवर झाले पाहिजे असेही पालिका सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी निवेदन केले. महापौर बंगल्यातील स्मारकाला पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपा आदी विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी महापौर बंगल्यातील स्मारकाला विरोध केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही स्मारकावरून वाद पेटला आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची घोषणा झाल्यानंतर पालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांच्या सूरात सूर मनसे व सपाचा मिळाला आहे.
बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर असून त्यांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे अशी इच्छाही आहे. पण या स्मारकासाठी ऐतिहासिक महापौर बंगल्याचा बळी दिला जाऊ नये. बाळासाहेबांचे वास्तव्य जी वास्तूत होते ते मातोश्री निवासस्थानच त्यांचे स्मारक म्हणून योग्य राहील असे पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सभागृहात सांगितले. तर महापौर बंगला ही ऐतिहासिक वस्तू असल्यामुळे ती स्मारकाला देण्यात येऊ नये असे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सांगितले. मनसेही महापौर बंगल्यातील स्मारकाला विरोध केला आहे. राज ठाकरेंनी याबाबत कालच भूमिका मांडली आहे. तीच भूमिका पालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी मांडली. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप विरूद्ध सर्वपक्षीय असा वाद पेटला आहे.
महापौर बंगला हा मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असल्यामुळे पालिका सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र, सेना-भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटल्याने या प्रस्तावाला काही दिवस खीळ बसेल असे बोलले जात आहे.