आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Property Family Dispute,t Hackeray\'s Sons In Ugly

बाळासाहेबांनी मुलगा जयदेवला संपत्तीतून केलेय बेदखल, प्रकरण कोर्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे व जयदेव ठाकरे - Divya Marathi
बाळासाहेब ठाकरे व जयदेव ठाकरे
मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आता त्यांच्या 100 कोटींपेक्षा अधिक असलेल्या संपत्तीवरून कौटुंबिक कलह चर्चेत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदास आणि धाकटे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पक्षातील चार वरिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन मुंबई हायकोर्टात मृत्यूपत्र सादर करीत एक याचिका दाखल केली आहे. बाळासाहेबांची आज जयंती आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बाळासाहेबांनी थोरला मुलगा जयदेव याला आपल्या संपत्तीतून का बेदखल केले ते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे आणि धाकटे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यात त्यांच्या संपत्तीवरून वाद सुरु झाले आहेत. बाळासाहेब यांनी सर्व संपत्ती उद्धव व त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे केली असल्याचे मृत्यूपत्रात उघड झाले आहे. मात्र, या मृत्यूपत्रासच जयदेव यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. हा दावा कोर्टात दाखल असताना किंवा प्रलंबित असेपर्यंत उद्धव यांना ही संपत्ती विकू देऊ नये किंवा हस्तांतरीत करू देऊ नये, अशी याचिका दाखल केली होती. मात्र, जयदेव यांची मागणी व याचिका कोर्टाने फेटाळून लावताना उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला होता.
अशा प्रकारची याचिका दिवंगत व्यक्तीच्या इच्छेनुसार संपत्तीचे वाटप किंवा अधिकार बहाल (मृत्यूपत्र) करण्याबाबतची असते. या याचिकेत म्हटले आहे, की ही सारी संपत्ती बाळासाहेब यांनी उद्धव यांना बहाल केली आहे. मात्र, बाळासाहेबांचे थोरले चिरंजीव जयदेव यांनी यास विरोध केला आहे. या मृत्यूपत्रावर बाळासाहेब यांची सही नसल्याचे जयदेव यांचे म्हणणे आहे.
उद्धव यांचे म्हणणे आहे की, बॅंक डिपॉजिट आणि इतर संपत्तीचे मूल्य सुमारे 14.85 कोटी आहे. मात्र जयदेव यांचे म्हणणे आहे, की मातोश्री या बंगल्याचीच किंमत 40 कोटींच्या घरात आहे. बाकी संपत्ती, दागिने व बॅंक डिपॉजिट मिळून ही एकूण संपत्ती 100 कोटींच्या घरात आहे. उद्धव व सेनेच्या नेत्यांनी कोर्टात दाखल केलेल्या मृत्यूपत्रानुसार, जयदेव यांच्यासह बाळासाहेब यांचा दिवंगत मुलगा बिंदूमाधव यांच्या कुटुंबियांचा संपत्तीत अधिकार नाही.
संपत्तीवरून उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे या बंधूंत सुरु झालेला न्यायालयीन वाद लवकरच संपेल. हा कौटुंबिक वाद असून, तो माध्यमांत व कोर्टात गेल्याचे दु:ख आहे. संपत्तीवरून या दोघांत काही गैरसमज झाले आहेत ते मी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांचे मामा चंद्रकांत वैद्य (चंदूमामा) यांनी म्हटले आहे.
पुढे वाचा, बाऴासाहेबांनी जयदेव यांना संपत्तीत बेदखल का केले?...