आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Property Issue, Now 1st Plea On 10 March

बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्ती वादावर 7 एप्रिलला सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 7 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच दिवशी जयदेव ठाकरेंच्या आक्षेप अर्जावरही सुनावणी होईल. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरून जयदेव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बाळासाहेबांनी मृत्यूपत्रात 14.85 कोटींची संपती असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा अधिक असून मातोश्री या बंगल्याची किंमतच 40 कोटी असल्याचे जयदेव यांचे म्हणणे आहे. मृत्यूपत्राप्रमाणे मातोश्रीचा पहिला मजला हा जयदेव यांच्या पत्नी स्मिता व नात ऐश्वर्या यांचे नावे आहे, दुसरा मजला हा उद्धव त्यांचे मुले आदित्य आणि तेजस यांना देण्याचे त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांचे मृत्यूपत्र तयार करताना प्रसिद्ध वकिल अधिक शिरोडकर, अनिल परब, शशी प्रभु, रवींद्र म्हात्रे (बाळासाहेबांचे स्वीय सहायक) आणि त्यांचे खासगी डॉक्टर जलील पारकर यांची उपिस्थती होती.

वाद मिटेल-चंदूमामा, वाचा पुढे...