आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Was Mentally Fit When He Signed Will Doctor To Bombay High Court

ठाकरेंच्या फॅमिली डॉक्टरांचा दावा - \'रोज तीन ग्लास वाइन घेत होते बाळासाहेब\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीवेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयदेव ठाकरे. - Divya Marathi
बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीवेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयदेव ठाकरे.
मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा तिढा अजून मिटलेला नाही. उद्धव आणि जयदेव या ठाकरे बंधुंमधील संपत्तीचा वाद अजून कोर्टात सुरु आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांचा संपत्तीच्या वाटणीवरुन मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या खटल्यात त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी कोर्टाला सांगितले, की बाळासाहेबांची मानसिक स्थिती चांगली होती. ते रोज तीन ग्लास वाइन घेत होते. जयदेव ठाकरेंच्या वतीने दावा करण्यात आला होता, की बाळासाहेबांनी मृत्यूपत्रावर जेव्हा स्वाक्षरी केली तेव्हा त्यांची प्रकृती आणि मानसिक स्थिती चांगली नव्हती. मात्र, जयदेव यांचा दावा ठाकरेंच्या फॅमिली डॉक्टरांनी कोर्टात फेटाळून लावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे ही बाळासाहेबांची मुले आहेत. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रवरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे. 13 डिसेंबर, 2011 रोजी बनवण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या अंतिम मृत्यूपत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा वाटा देण्यात आला आहे. त्या तुलनेत जयदेव यांना फार कमी वाटा मिळाला आहे.
मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश गौतम पटेल यांच्या अध्यक्षतेतील पीठाने साक्षीदार म्हणून हजर झालेल्या डॉक्टरांना दिवंगत शिवसेना प्रमुखांनी मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली तेव्हा त्यांची मानसिक स्थितीबद्दल प्रश्न विचारला.त्यावर डॉक्टरांनी त्यांची मानसिक स्थिती चांगली असल्याचे सांगितले. जेव्हा डॉक्टरांना विचारण्यात आले मग त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमावेळी तुम्ही त्यांच्यासोबत का राहात होते, त्यावर डॉक्टर म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचीच तशी इच्छा होती. मात्र, कोर्टाने डॉक्टरांना वैद्यकीय स्वरुपात उत्तर देण्यास सांगितले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, की मी बाळासाहेब ठाकरेंसोबत राहात होतो, कारण कोणत्याही क्षणी त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासू शकत होती.
ठाकरेंच्या फॅमिली डॉक्टरांना जयदेव यांच्या वकीलांनीही काही प्रश्न विचारले. जयदेव यांच्या वकीलांनी विचारले, 'हे खरं आहे का, की त्यांनी मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली तेव्हा त्यांची मानसिक स्थिती आणि स्मरणशक्ती चांगली नव्हती ?' या प्रश्वावर डॉक्टर म्हणाले, 'हे खरं नाही.' जेव्हा डॉक्टरांना विचारण्यात आले, त्यांचे उद्धव यांच्यासोबतचे संबंध कसे होते. त्यावर डॉक्टरांनी उत्तर दिले, 'मधूर आणि कुटुंबात असतात तसे.'
बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीची संपूर्ण ठाकरे परिवार चौकशी करत असल्याचेही डॉक्टरांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि बाळासाहेबांचे पुतणे राज आणि पुत्र जयदेव हे देखील बाळासाहेबांच्या प्रकृतीची वेळोवेळी चौकशी करत होते.'
पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे वाद