आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे मृत्युपत्र खटल्याची अनोळखी व्यक्तीने नेली कागदपत्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युपत्रावरील खटल्यादरम्यान बुधवारी एक खळबळजनक घटना घडली. हा खटला ज्यांच्या न्यायालयात सुरू आहे, त्या न्या. गौतम पटेल यांच्या दालनातून एक अनोळखी व्यक्ती या खटल्याशी संबंधित कागदपत्रे नियमितपणे घेऊन जात असल्याचा खुलासा खुद्द न्या. पटेल यांनी केला. ही व्यक्ती आतापर्यंत चार वेळा अशा पद्धतीने कागदपत्रे घेऊन गेली असून त्याबाबत दोन्ही पक्षांच्या वकिलांनाही काहीच माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून त्यांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान सुरू असलेल्या उच्च न्यायालयातील खटल्यादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली आहे. एक अनोळखी व्यक्ती या खटल्यातील तपासलेल्या साक्षी पुराव्यांच्या नोंदीसंदर्भातली कागदपत्रे नेते. जयदेव ठाकरेंच्या वकील अॅड. सीमा सरनाईक यांनी ही कागदपत्रे मागवल्याचे ही व्यक्ती सांगते, असेही न्या. पटेल म्हणाले. मात्र, याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचा खुलासा अॅड. सरनाईक यांनी केला आहे. त्या व्यक्तीचा नेमका हेतू काय आहे, हे जरी माहिती नसले तरी ही गंभीर बाब असून यापुढे ओळखपत्राशिवाय कार्यालयातून कागदपत्रे दिली जाणार नाहीत, असेही न्या. पटेल यांनी स्पष्ट केले. यावर यापुढे आपल्याला कागदपत्रे हवी असल्यास सहकाऱ्यांसोबत आम्ही आमच्या सहीचे पत्र देऊ, अशी भूमिका अॅड. सीमा सरनाईक आणि उद्धव ठाकरेंचे वकील अॅड. राजेश शहा यांनी स्पष्ट केली.
खटल्याची पार्श्वभूमी
बाळासाहेबठाकरे राहत असलेल्या मातोश्री या निवासस्थानाचा काही भाग आपल्याला येणे अपेक्षित असतानाही बाळासाहेबांच्या १३ डिसंेबर २०११ रोजी केलेल्या मृत्युपत्रात त्याचा उल्लेख नसल्यामुळे जयदेव ठाकरेंनी हे मृत्युपत्र खोटे असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आतापर्यंतच्या सुनावणीदरम्यान लीलावती रुग्णालयातले डॉ. जलील परकार यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसात परकार हे ठाकरेंची नियमित तपासणी करत असत. यापुढील ३० जूनच्या सुनावणीदरम्यान दुपारी बारा वाजता शिवसेना उपनेते आणि आमदार अॅड. अनिल परब यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...