आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray\'s 23 Feet Bronze Statue In Final Statge

बाळासाहेबांचा 23 फुटी ब्राँझचा पुतळा तयार पण स्मारक कुठे अन् कधी उभारणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील ताडदेव भागात हा पुतळा बनविण्यात येत आहे. - Divya Marathi
मुंबईतील ताडदेव भागात हा पुतळा बनविण्यात येत आहे.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत ते ही दादर परिसरातच भव्य स्मारक उभारण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, या भव्य स्मारकासाठी व बाळासाहेबांसारख्या भारदास्त व्यक्तिमत्त्वासाठी जागेचा अद्याप शोध सुरु आहे. कधी दादरमधील शिवाजी पार्कवर तर कधी महापौर निवासात स्मारक होणार अशी चर्चा होते. मात्र, 5-6 जागांचा शोध घेऊनही अद्याप एकाही जागेवर मतैक्य झाले नाही हेच म्हणावे लागेल.
स्मारकाच्या जागेबाबत घोळ सुरु असला तरी बाळासाहेबांचा भव्य असा 23 फुटी पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शिल्पकार यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेला हा पुतळा संपूर्ण ब्राँझचा असेल. या पुतळ्याचे सध्या मेणाचे व फायबरचे काम झाले आहे. मात्र, यावर शेवटचा हात फिरवला जाणार आहे. यासाठी हा पुतळा थेट कोल्हापूरला नेण्यात येणार आहे.
पुढे पाहा, पुतळयासमोर उभे राहून उद्धव ठाकरेंनी केले फोटोसेशन...