आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thakre And Raj Thakre Shivsena Mns Shivaji Park Rally

मुंबई पालिकेवरला भगवा झेंडा खाली उतरु देऊ नका- बाळासाहेब ठाकरे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे 13 फेब्रुवारी रोजी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या दिवशी बाळासाहेबांची वांद्रे-कुर्ला संकुलात सभा होत असून, तेव्हाच शिवाजी पार्कवर आपली सभा घेण्याची योजना राज ठाकरे यांनी आखली आहे.
उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क सायलेंस झोन म्हणून जाहीर केल्यानंतर तेथे राजकीय पक्षांच्या सभांना महापालिका परवानगी देत नाही. मात्र मनसेने आगामी निवडणुकांच्या प्रचाराची अंतिम सभा शिवाजी पार्कवर घेण्याचे ठरवले आहे. यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबरोबर अन्य कार्यक्रमांना महापालिकेने दिलेल्या परवानगीचे उदाहरण दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 फेब्रुवारी रोजी राज ठाकरे शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता करणार होते परंतु शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांची 13 फेब्रुवारी रोजी बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर सभा आयोजित करताच याचिकेत 12 फेब्रुवारी ऐवजी 13 फेब्रुवारी असा बदल करण्यात आला असून आता 13 फेब्रुवारीसाठी संमती मागण्यात येत आहे. याचिकाकर्ता आणि मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी 13 तारखेला शिवाजी पार्क सभेसाठी मिळावे अशी मागणी याचिकेत केली असल्याचे सांगितले.
शिवसेनाप्रमुखांसमोर भव्य सभा आयोजित करून मनसेची ताकद दाखवून देण्यासाठी 13 तारखेची मागणी मनसेने केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राज ठाकरे यांना हे मान्य नाही. त्यांनी म्हटले आहे की, 13 तारीख आम्ही मुद्दाम मागितलेली नाही. 12 तारखेलाच सभा घेणार होतो परंतु 12 तारखेला प्रचाराचा शेवटचा रविवार मिळत असल्याने उमेदवारांना आपापल्या विभागात जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यासाठी वेळ मिळावा म्हणून आम्ही 12 ऐवजी 13 तारखेला सभा घेत आहोत. मनसेने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 2 फेब्रुवारीची तारीख दिली आहे.
आज नक्कल करणारेच जास्त : बाळासाहेब
मी माझ्या वडिलांचे गुण घेतले, परंतु त्यांची कधी नक्कल केली नाही. आज नक्कल करणारे अनेक जण बाहेर फिरत आहेत, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी रंगशारदा येथे आयोजित पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली. प्रारंभी शिवसेनेच्या प्रचार गीतांच्या सीडीचे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, काही जणांनी परीक्षा घेऊन गटारात गाळ किती आहे, त्याची लांबी-रुंदी किती आहे, खड्डे किती मोठे आहेत याची माहिती घेतली. मी तुमची कधी परीक्षा घेतली आहे का, असा प्रश्न त्यांनी पदाधिका-यांना विचारला. कार्यकर्त्यांना गाळ काढायला लावायचा आणि स्वत: आरामात बसायचे, असे आम्ही कधीच केले नाही. गुजरातचा मला अभिमान नाही, मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. महाराष्ट्र माझी आई आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादीवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणे म्हणजे भ्रष्टाचारच आहे. भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाºया अण्णा हजारे हे चांगली व्यक्ती असले तरी सध्याचा काळ त्यांच्यासाठी चांगला नसल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी अण्णा हजारेंवर टीका करणाºया बाळासाहेबांनी आज त्यांची स्तुती केल्याने मात्र उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.
मुंबईतील हातची सत्ता जाऊ देऊ नका- मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत एकदिलाने लझा. आपापसातले मतभेग गाडा आणि सगळ्यांनी एकच शपथ घ्या की, कोणत्याही परिस्थितीत मुंबईची सत्ता हातची जाऊ देणार नाही. मुंबई पालिकेवरला भगवा झेंडा खाली उतरु देऊ नका. तसेच काँग्रेसला मत म्हणजे भ्रष्टाचारच, असे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दूर ठेवा असे आवाहन ठाकरे यांनी केले.
निवडणूक आयोग सरकारच्या दबावात - राज ठाकरे
ठाकरे, पवार आणि निवडणुकीचा पव्वा !
अखेर महायुतीचे घोडे गंगेत न्हाले; बाळासाहेब राहणार स्‍टार प्रचारक