आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasahebl Thackeray's Sons In Legal Row Over Property Issue

बाळासाहेबांची संपत्ती व मृत्यूपत्र वाद: उद्धव ठाकरेंना झटका, हायकोर्टाने फेटाळली मागणी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्ती व मृत्यूपत्रावरून सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राच्या वादात कुटुबियांचा तपशील देणे व्यवहार्य नाही व त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे जयदेव ठाकरे यांनी कोर्टात सादर केलेल्या ठाकरे कुटुंबियांच्या माहितीची नोंद करून घेऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या वकिलाने हायकोर्टात केली. मात्र, हायकोर्टाने उद्धव ठाकरे व त्यांच्या वकिलांची ही मागणी अमान्य केली. जयदेव ठाकरेंना त्यांचे म्हणणे मांडू द्या. तसेच त्यांना केस लढवू द्या असे हायकोर्टाने सुनावले.
बाळासाहेबांची संपत्ती आणि बाळासाहेबांनी मृत्यूपूर्वी केलेल्या मृत्यूपत्र बनावट असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला वडिलांच्या संपत्तीतून हद्दपार केल्याचा आरोप करीत थोरले बंधू जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. गेली दोन-तीन वर्षे हा वाद कोर्टात सुरु आहे. या प्रकरणी न्यायाधिश गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या वकिलाने जयदेव यांचे म्हणणे ऐकून घेऊ नये. मृत्यूपत्राच्या वादात कुटुंबियांची माहिती व इतर तपशील देण्याची गरज नाही. त्यामुळे जयदेव ठाकरेंचे सादर केलेली माहिती व इतर बाबींची कागदोपत्री नोंद करून घेऊ नये अशी मागणी केली.
यावर न्यायाधीश गौतम पटेल यांनी उद्धव ठाकरेंची मागणी अमान्य केली. न्यायाधिशांनी सांगितले की, जयदेव यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपली बाजू मांडण्यासाठीच जयदेव यांनी कुटुंबियांची माहिती दिली आहे. यात चुकीचे अथवा आक्षेप घेण्यासारखे काय आहे? असा सवाल करीत उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावली.
जयदेव यांनी कुटुंबियांच्या माहितीसह बाळासाहेबांशी संबंधित नऊ कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. बाळासाहेबांवर लिलावती रूग्णालयात सुरू होते. याविषयीच्या कागदपत्रांची कोर्टाने नोंद करून घेतली व इतर कागदपत्रे तपासणीसाठी कोर्ट प्रशासनाकडे पाठवली. दरम्यान, कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या वकिलांना जयदेव यांची उलटतपासणी घेण्याचे निर्देश दिले. मात्र, जयदेव यांनी सुनावणीस उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविले होते. मात्र, ते अचानक हजर राहिले आहेत. त्यामुळे ऐनवेळी त्यांची उलटतपासणी घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईत निधन झाले. त्यानंतर बाळासाहेबांनी केलेले मृत्यूपत्र हायकोर्टात प्रमाणित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अर्ज केला. मात्र, त्यावर उद्धव यांचे थोरले बंधू जयदेव यांनी आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून, त्याची सुनावणी सुरू आहे.
बाळासाहेबांच्या संपत्तीचे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची तब्बेत अत्यस्वस्थ होते. त्यामुळे हे मृत्यूपत्र खरे नाही. बाळासाहेबांची दिशाभूल करून त्यांच्या अनुपस्थितीत करून हे मृत्यूपत्र तयार केल्याने ते बनावट ठरते. त्यामुळे हे मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव कोर्टात अर्ज करू शकत नाही, अशी भूमिका जयदेव यांनी केला आहे.