आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: बालगंधर्वांच्या अस्तित्वखुणा विस्मृतीत; सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कमालीची अनास्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिरुचिसंपन्न स्त्री भूमिकांनी  रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचा मृृत्यू १५ जुलै १९६७ रोजी पुणे येथे अतिशय विपन्नावस्थेत झाला. त्यांच्या निधनाला १५ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण हाेत अाहेत. यानिमित्ताने काही संस्थांनी बालगंधर्वांवर कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी बाकी सरकारी पातळीवर सर्वत्र अनास्थाच दिसते. बालगंधर्व यांच्याशी  संबंधित सर्व जुनी संदर्भसाधने, ध्वनिमुद्रिका, पुस्तके, त्यांच्यावरील विशेषांक हे सारे संकलन एकत्रित मिळेल असे एखादे हक्काचे ठिकाण नाट्यप्रेमी  म्हणविणाऱ्या महाराष्ट्राला अजून स्थापन करता आलेले नाही.  

बालगंधर्वांच्या नाट्यकारकीर्दीला यशस्वी वळण देण्यात मुंबई, पुणे या दोन शहरांचा मोठा वाटा आहे. बालगंधर्वांविषयी सर्वात अधिक संदर्भसाधने मुंबईत फक्त मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर पूर्व येथील नायगाव शाखेत उपलब्ध आहेत. मात्र येथील कारभार इतका भोंगळ आहे की, अभ्यासकांना हवी असलेली संदर्भसाधने वेळेवर मिळणे जिकिरीचे झाले आहे.    

१९४० च्या दशकात बालगंधर्व यांची अवस्था अधिक बिकट झाली हाेती. त्या वेळी बालगंधर्व आपल्या चाहत्यांमध्ये जो वेळ घालवत, त्याचे काही संदर्भ  बाळ सामंत लिखित ‘तो एक राजहंस’ या पुस्तकात मिळतात. रुईया महाविद्यालय व दादर पश्चिमेला पूर्वी जिथे कोहिनूर टाॅकीज होती (आता तिथे नक्षत्र माॅल आहे.) त्याच्यासमोर श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस आहे.  त्या दोन वास्तूंमध्ये बालगंधर्वांचे जाणे होत असे. या बोर्डिंग हाऊसमध्ये कलाकार गणपतराव लाड यांचे पुत्र सीताकांत राहत असत. ते मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओवर प्रोगाम असिस्टंट म्हणून काम करत होते.  दादर पूर्वेला पाम व्ह्यू नावाच्या इमारतीत रुईया महाविद्यालयाचे पूर्वी विद्यार्थी वसतिगृह होते. १९४० च्या दशकात बाळ सामंत या वसतिगृहात राहत होते. त्यांच्या रूमवर बालगंधर्व नेहमी यायचे.  
बातम्या आणखी आहेत...