आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balika Vadhu Actress Pratyusha Banerjee Commits Suicide

दोन महिन्यांची प्रेग्नेंट होती प्रत्युषा? पोलिस चौकशीनंतर बॉयफ्रेंडला हॉस्पिटलमध्ये दाखल केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉयफ्रेंड राहुल राज सिंहसोबत प्रत्युषा बॅनर्जी - Divya Marathi
बॉयफ्रेंड राहुल राज सिंहसोबत प्रत्युषा बॅनर्जी
मुंबई- 'बालिका वधू'ची 'आनंदी' अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. प्रत्युषाच्या युट्रसमध्ये पांढ-या रंगाचे थीक फ्लूइड आढळले आहे. त्यातून प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या स्टेजची माहिती मिळते. प्रत्युषा दोन महिन्यांची प्रग्नेंट होती असे सांगितले जात आहे. सर्जन डॉ. एस. एम. पाटील यांनी मीडियासोबत बोलताना याला दुजोरा दिला. ते म्हणाले, फ्लुइड स्टोअर करण्यात आले आहे. हिस्टोपॅथॉलजी चाचणीसाठी पाठवले आहे.' याच दरम्यान 14 तासांच्या चौकशीनंतर प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह याला रुग्णालयात दाखल झाले आहे. त्याच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले जात आहे.
पोस्टमॉर्टेमनंतर शनिवारी प्रत्युषाला नववधूसारखे सजवून अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्नासाठी डिझायनर रोहित शर्माने तयार केलेला लहेंगा नेसवूनच तिला शेवटचा निरोप देण्यात आला.
दरम्यान, तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले की, प्रत्युषा याच आठवड्यात साखरपुड्याची तयारी करत होती. १४ एप्रिलनंतर ती आपला प्रियकर राहुलराज सिंहसाेबत लग्नाचा बेत आखत होती. पण राहुल त्यासाठी तयार नव्हता. याच मुद्द्यावरून आत्महत्येच्या आदल्या दिवशी गुरुवारी त्यांचे भांडण झाले होते. शुक्रवारी सकाळीही प्रत्युषाचे आधी राहुलची मैत्रीण सलोनी संध्याकाळी राहुलशी भांडण झाले. तिच्या मित्रांनुसार, राहुल अनेकदा प्रत्युषाला मारहाण करायचा. शेजारी अनुज सचदेवाने सांगितले की, घटनेच्या दिवशी त्यांनी तिला रडताना पाहिले होते. ती राहुलवर विश्वासघाताचा आरोप करत होती. दुसरीकडे, पोलिसांनी शनिवारी राहुलराज सिंहसह इतरांची चौकशी केली. त्याला अटक झाली नसली तरी क्लीन चिट देण्यात आलेली नाही. वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक भंडारे म्हणाले की, सध्या तरी हे प्रकरण आत्महत्येचेच दिसते. तिच्या आई-वडिलांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, पण तपास सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्री राखी सावंतने खुलासा केला की, प्रत्युषाने महिनाभरापूर्वीच एक कोटींचा विमा उतरवला होता. तिला तिच्या आई-वडिलांना विम्याचे नॉमिनी करायचे होते. पण राहुल बळजबरीने नॉमिनी बनला होता.

गोरेगावात तिचा फ्लॅट असलेल्या इमारतीच्या वॉचमनने सांगितले की, राहुलची दुसरी गर्लफ्रेंड सलोनी तिच्या घरी यायची. दोघींची भांडणे व्हायची. काही दिवसांपूर्वी सलोनी राहुलशी भांडली होती. तिने प्रत्युषालाही धमकी दिली होती. प्रत्युषाच्या एका मैत्रिणीने सांगितले की, यापूर्वीच्या संबंधविच्छेदामुळे प्रत्युषाला या वेळी लग्न करून लवकरच स्थिरावायची इच्छा होती. पण राहुल त्यासाठी तयार नव्हता. पोस्टमॉर्टेमनुसार, प्रत्युषाचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. तिच्या गळ्यावर दोन खुणाही आढळल्या आहेत. अद्याप व्हिसेरा अहवाल यायचा बाकी आहे.

याकारणामुळे राहुलवर संशय :
राहुलनेसर्वात आधी प्रत्युषाला पंख्याला लटकलेली असल्याचे पाहिले होते. पण त्याने याची माहिती पोलिसांना दिली नाही. तसेच तिला गोरेगावात जवळच्याच रुग्णालयात नेण्याऐवजी दूरच्या कोकिलाबेन रुग्णालयात नेले. येथेही पोलिसांना मृत्यूची माहिती रुग्णालयाकडूनच देण्यात आली. राहुल रुग्णालयातून प्रत्युषाचा मोबाइल घेऊन काही क्षणांसाठी गायब झाला होता.

प्रत्युषाची अंत्ययात्रा.
- प्रत्युषाची मैत्रीण राखी सावंत म्हणाली : प्रत्युषाच्याकोटीच्या विम्यासाठी राहुलने बळजबरीने स्वत:ला केले नॉमिनी.
-शेजारी म्हणाला : घटनेच्यादिवशी दाेघांचे भांडण, फसवल्याचा राहुलवर केला आरोप.
घटस्फोटित आहे राहुल...
- राहुल आणि प्रत्युषाची कॉमन फ्रेंड लीना डियासने दिलेल्या माहितीनुसार, ''राहुल घटस्फोटित आहे. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर त्याला लोखंडवाला परिसरात मद्यधुंद अवस्थेत पाहिले गेले. राहुल आणि सलोनी शर्मा प्रत्युषाला टॉर्चर करत असे. राहुलसोबत लग्न करुन प्रत्युषाला सेटल व्हायचे होते. मात्र राहुलला तिच्याशी लग्न करायचे नव्हते.''
- सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान पोलिसांना प्रत्युषाच्या फ्लॅटमधून दोन सेलफोन मिळाले. दोन्ही फोन्सची फॉरेन्सिक टेस्ट होणारेय. प्रत्युषाने शेवटचा कॉल कुणाला केला होता, हे यातून बघितले जाणारेय.
पुढिल स्लाइड्सवर वाचा, राहुलने काय-काय सांगितले....
- एक दिवस आधीच झाले होते बॉयफ्रेंडशी भांडण....
- प्रत्युषाचे शेवटचे व्हॉट्स अॅप स्टेटस....