आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी मोर्चा: मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर अाज जड वाहनांना प्रवेशबंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ मुंबई- सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (ता. ९) मुंबईत ‘मराठा क्रांती मूक महामाेर्चा’चे अायाेजन करण्यात अाले अाहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून माेठ्या संख्येने वाहने मुंबईच्या दिशेने जाणार असून काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत हाेण्याचीही शक्यता व्यक्त केली जात अाहे. त्यामुळे बुधवारी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर  जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात अाली अाहे.

महामाेर्चात सहभागी हाेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून माेठया संख्येने माेर्चेकरी, खासगी व सार्वजनिक वाहनाने येणार अाहेत. तसेच सदर दिवस हा कार्यालयीन कामकाजाचा असल्याने मुंबई शहरात वाहतूक काेंडी हाेण्याची दाट शक्यता अाहे. सदर वाहतूक काेंडी टाळण्यासाठी मुंबई शहरात येणारी अवजड वाहने मुंबई बाहेर थांबवणे अावश्यक अाहे. त्याकरिता नऊ अाॅगस्ट राेजी मुंबईच्या दिशेने प्रवास करणारी जड वाहने सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टाेल नाका, राष्ट्रीय महामार्ग क्र.तीनवर घाेली टाेल नाका, राष्ट्रीय महामार्ग चारवर कुसगाव टाेल नाका, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर वाकण फाटा, राष्ट्रीय महामार्ग अाठवर खानीवडे टाेल नाका या ठिकाणी थांबवण्यात येणार अाहेत.

विभागनिहाय माेर्चेकऱ्यांसाठी पार्किंग व इतर व्यवस्था
नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी शहापूर येथे महामार्गालगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यात आनंदनगर जकात नाका येथील मैदानात  पार्किंग उभारण्यात आले असून तिथे नाष्टा आणि मोबाइल टॉयलेटची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रातून आल्यानंतर भायखळ्याला ट्रेनने जाण्यासाठी मध्य रेल्वेने जावे लागेल. कल्याण, ठाणे या स्थानकांतून मध्य रेल्वेने जाता येईल. भायखळा स्टेशनला उतरल्यानंतर जवळच वीर जिजामाता उद्यान असून तेथे मोर्चात सहभागी होता येणार आहे. 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची सोय वाशी एपीएमसी मार्केटमध्ये केली आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल
बुधवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत. डॉ. आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जेजे फ्लायओव्हरपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. 

जे.जे. फ्लायओव्हरवरून दोन्ही बाजूंनी येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांना बंद असतील. याचबरोबर कर्नाक बंदर ते कर्नाक ब्रिजकडे वाहतूक पूर्ण बंद असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...