आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ban On Maggi Continues Till 30 June mumbai Highcourt

मॅगीवरील बंदी कायम, हायकोर्टाचा नेस्लेला दणका; सुनावणी 30 जूनला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मॅगीच्या विविध उत्पादनांवर महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले इंडियाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली खरी पण मात्र त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मॅगीवरील बंदी कायम राहणार आहे. मॅगीवरील बंदी उठविण्याबाबत नेस्ले इंडियाने गुरुवारी याचिका दाखल केली होती.
दिल्लीच्या फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अॅथॉरिटी (FASSAI) तर्फे नुकतीच मॅगीच्या नऊ प्रकारच्या उत्पादनांवर बंदी घालून त्यांचा सर्व साठा बाजारातून मागे घेण्याचा आदेश देण्यात आला होता. महाराष्ट्रातही मॅगीचे उत्पादन व विक्रीवर यांच्यावर बंदी लादण्यात आली आहे. या आदेशाला नेस्लेकडून मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले. यावर आज सुनावणी झाली. न्यायाधिश विद्यासागर कानडे व न्यायाधिश बी. पी. कोलाबावाला यांनी याची सुनावणी करताना सांगितले की, सरकारी संस्थेने घातलेली बंदी योग्य आहे की अयोग्य हे ठरविण्यासाठी त्यांचा अहवाल मिळायला हवा. त्यासाठी बाबत आदेश काढले. त्यामुळे (FASSAI) या संस्थेने मॅगीच्या विविध 9 नमुन्यांची तपासणी केली आहे. त्याचा अहवाल पंधरा दिवसात हायकोर्टाकडे सादर करावा. त्यानंतरच नेस्लेच्या याचिकेवर विचार करता येईल. यासाठी न्यायाधिशांनी पुढील सुनावणी 30 जून रोजी ठेवली आहे. त्यामुळे सरकारने घातलेली मॅगीवरील बंदी उठविण्यास हायकोर्टाने नकार दिला.
महाराष्ट्रासह भारताची राजधानी दिल्लीव उर्वरित 11 राज्यांत नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले इंडियाने गुरुवारी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. केंद्र सरकारच्या विविध राज्यांच्या अन्न व औषध प्रशासनाने घातलेली बंदी अयोग्य आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FASSAI) या संस्थेने मॅगीच्या विविध 9 नमुन्यांची तपासणी केली. मात्र त्याचा अहवाल आम्हाला दिला नाही. ही तपासणी कशाच्या आधारावर केली याचीही माहिती आम्हाला मिळायला हवी असे नेस्लेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.
नेस्ले कंपनीच्या मॅगीमध्ये एमसीजी व शिसे हे घातक पदार्थ आढळल्याने मॅगीवर दिल्ली आणि महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 5 जून रोजी मॅगी नूडल्सवर बंदी घातली. शिवाय एफएएसएसएआयने याबाबत मॅगीला नोटीस जारी करुन 15 दिवसांत उत्तर मागितले आहे. त्यामुळे दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी या बंदीचा कायदेशीर तपशील देण्याची मागणी नेस्ले इंडियाने केली आहे. दरम्यान, हायकोर्टाच्या निर्देशानुसार FASSAI ला मॅगीवर बंदी का घातली त्याचा अहवाल सादर करावा लागेल.