आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घाला, मुंबई उच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले आहेत. अशा विक्रीवर बंदी घाला. तसेच ऑनलाइन औषधविक्रीच्या जाहिरातींवरही नियंत्रण ठेवले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने बजावले. शिक्षिका मयूरी पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या न्यायपीठाने हे आदेश दिले. पाटील यांच्या वकील वल्लरी जठार म्हणाल्या, डॉक्टरांचा सल्ला न घेताच ऑनलाइन औषधे मागवली जातात. हे नियमबाह्य आहे. सरकारला अशी औषधविक्री करणाऱ्या वेबसाइटची यादीही देण्यात आली आहे. परंतु, कारवाईच होत नाही. यावर अशा वेबसाइटवर सरकारने काय कारवाई केली, अशी विचारणा न्यायपीठाने केली.
बातम्या आणखी आहेत...