Home »Maharashtra »Mumbai» Ban On Plastic Bags From 29th August

गुढीपाडव्यानंतर मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी; पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 15:15 PM IST

  • 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर प्लास्टिक पिशव्यांमुळे मुंबई तुंबली होती असा निष्कर्ष काढण्यात आला होता. याच पार्श्वभुमीवर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई- गुढीपाडव्यानंतर मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशव्या बंदी लागू करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर प्लास्टिक पिशव्यांमुळे मुंबई तुंबली होती असा निष्कर्ष काढण्यात आला होता. याच पार्श्वभुमीवर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याने प्लास्टिक पिशव्यांच्या जागी कोणत्या पर्यावरणपूरक पिशव्या आणू शकतो यासंबंधी विचार केला जात आहे. यासंबंधी अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे याआधी 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या महापुरानंतरही प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर निर्बंधाची कारवाई महापालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती. काही काळ त्याची अंमलबजावणी योग्यपद्धतीने झाली. नंतर मात्र त्यात ढिलाई आली. त्यामुळे सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसू लागला.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended