आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासगाव: आबांच्या पत्नी सुमनताईंचा विक्रमी विजय, मिळवली 1, 31, 236 मते!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी 1 लाख 12 हजार 963 मतांनी विक्रमी विजय मिळवला आहे. सुमन पाटील यांना एकूण 1 लाख 31 हजार 236 मते मिळाली तर स्वप्निल पाटील यांना फक्त 18 हजार 273 मते मिळाली. कमी मते मिळाल्याने स्वप्निल पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. असे असले तरी तासगावात आबांच्या दुखद निधनामुळे राष्ट्रवादी व पाटील कुटुंबिय या विजयाचा आनंद साजरा करणार नाहीत. भाजपचे बंडखोर उमेदवार व अपक्ष स्वप्निल पाटील यांचे सुमन पाटील यांनी डिपॉझिट जप्त केले आहे.
तासगाव येथील शासकीय गोदामात मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरवात झाली. 19 फेर्‍यांमध्ये संपूर्ण निकाल जाहीर करण्‍यात येणार आहे. तासगाव पोटनिवडणुकीच्या पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सुमनताई पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. सुमन पाटील यांच्याविरोधात सर्वच उमेदवार अपक्ष असल्याने व एकाही बड्या पक्षाचा उमेदवार नसल्याने सुमन पाटील यांच्या मतांत प्रत्येक फेरीत मोठी वाढ होत राहिली व ती अखेरपर्यंत राहिली.
पुढे पाहा, प्रत्येक फेरीत सुमन पाटलांना कशी व किती मते मिळत गेली....