आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bandra Bypoll Result Live, Shivsena Ahead In 1st Round

वांद्रे: शिवसेनेचा नेम अन् राणेंचा पुन्हा गेम, तृप्ती सावंत 19 हजार मतांनी विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा 19 हजार 8 मतांनी पराभव करीत त्यांना धूळ चारली आहे. शिवसेनेने नारायण राणेंवर नेम धरल्यानेच त्यांचा पुन्हा गेम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 52 हजार 711 मते मिळाली आहेत. तर, नारायण राणेंना 33 हजार 703 मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार राजा रहेबर खान यांना केवळ 15 हजार 50 मते मिळाली व ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले.
आज सकाळी 8 वाजता वांद्रे पूर्वच्या समाज मंदिर सभागृहात मतमोजणी सुरू झाली. मात्र तृप्ती सावंत यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत राणेंना पिछाडीवर ढकलले होते. राणेंची ही पिछाडी कायम राहिली व उत्तरोत्तर फेरीत ती वाढतच गेली. अखेर तृप्ती सावंत यांनी राणेंचा 19 हजारांहून अधिक मतांनी दारूण पराभव केला.
पुढे पहा प्रत्येक फेरीत सावंत व राणेंना कशी व किती मते मिळाली आहेत...
तृप्ती सावंत यांनी पहिल्या फेरीत 1 हजार 47 मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत सावंत यांना 2559 मते तर नारायण राणेंना 1512 मते मिळाली आहेत. तर एमआयएमच्या राजा रहेबार खान यांना केवळ 295 मते मिळाली आहेत.
- दुस-या फेरीअखेर शिवसेनेच्या सावंत यांना 8752 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना 5019 मते मिळाली आहेत. राजा रहेबार खान यांना 761 मते मिळाली आहेत.
- तिस-या फेरीअखेर तृप्ती सावंत यांनी 10 हजार 330 मते घेतली आहेत तर नारायण राणे यांना 7124 मते मिळाली आहेत. एमआयएमच्या खान यांना तिस-या फेरीअखेर 2564 मते मिळाली आहेत.
- चौथ्या फेरीअखेर तृप्ती सावंत यांना 15 हजार 68 मते मिळाली आहेत तर नारायण राणेंना 8981 मते मिळाली आहेत. एमआयएमच्या खान यांना 3369 मते मिळाली आहेत.
- पाचव्या फेरीअखेर शिवसेनेला 17 हजार 786 मते तर राणेंना 10 हजार 646 मते मिळाली आहेत. एमआयएमला पाचव्या फेरीअखेर 3663 मते मिळाली आहेत.
- सातव्या फेरीअखेर तृप्ती सावंत यांना 25 हजार 253 मते मिळाली आहेत. तर राणेंना 13 हजार 485 मते मिळाली आहेत. एमआयएमला 4315 मते मिळाली आहेत.
- नवव्या फेरीअखेर तृप्ती सावंत यांना 34 हजार 314 मते मिळाली आहेत तर नारायण राणेंना 17541 मते मिळाली आहेत. एमआयएमला 4557 मते मिळाली आहेत.
- शिवसेनेला नवव्या फेरीअखेर सुमारे 17 हजार मतांची आघाडी. नारायण राणेंची पिछाडी कायम तर सेना प्रत्येक फेरीत आघाडी घेत असल्याचे चित्र.

- अकराव्या फेरीअखेर शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 40 हजार 285 मते मिळाली आहेत तर नारायण राणेंना 21 हजार 672 मते मिळाली आहेत. एमआयएमला 6161 मते मिळाली आहेत.
- अकराव्या फेरीअखेर शिवसेनेला 18 हजार 613 मतांची आघाडी मिळाली आहे.
- बाराव्या फेरीअखेर शिवसेनेच्या सावंत यांना 43 हजार 83 मते मिळाली आहेत तर राणेंना 23 हजार 342 मते मिळाली आहेत. सावंत यांना 19 हजार 741 मतांची आघाडी, सावंत विजयाच्या दिशेने... राणेंचा पराभव निश्चित.
वांद्रेत चौदाव्या फेरीअखेर शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 45 हजार 123 मते मिळाली आहेत. तर नारायण राणेंना 28 हजार 433 मते मिळाली आहेत. एमआयएमच्या रेहबर खान यांना 10 हजार 571 मते मिळाली आहेत.
- चौदाव्या फेरीअखेर शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 16 हजार 690 मतांची आघाडी मिळाली आहे.
पुढे पाहा, नारायण राणेंच्या पराभवानंतर शिवसेनेने असा केला जल्लोष...