आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर न्याय मिळाला, नपुंसक पतीपासून घटस्फोट मिळाल्याने \'ती\'ची सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लग्न झाल्यानंतर सहा महिने झाल्यानंतरही पत्नीशी शारिरीक संबंध ठेवण्यास असमर्थ ठरलेल्या 26 वर्षीय पतीला पत्नीच्या माहेरच्यांनी लग्नांमध्ये खर्च केलेले 2 लाख रूपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाने याबाबतचा निर्णय देताना पत्नीला मोठा दिलासा दिला आहे.
याबाबतची माहिती अशी, संबंधित जोडप्याचे 2010 मध्ये लग्न झाले आहे. मात्र, लग्नानंतर पती शारीरिक संबंध ठेवण्यास समर्थ नाही असे पत्नीच्या लक्षात आले. त्यामुळे त्याच काळात तिने पती नपुसंक असल्याने लग्न रद्द करावे, अशी मागणी केली होती. यासाठी तिने कोर्टात धाव घेतली. पत्नीच्या याचिकेनुसार लग्नानंतर एका आठवड्याने दोघेही महाबळेश्वरला हनिमूनला गेले होते. मात्र, तेथून शारीरिक संबंध प्रस्थापित न करताच ते परतले. त्यानंतर ते माथेरानला सेकंड हनिमूनला गेले आहे. तेथेही पत्नीच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे तिला प्रचंड धक्का बसला. या दरम्यान, सासूने तिला दिराशी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता.
आणखी पुढे वाचा...