आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशमध्ये ४६ वर्षांनंतर प्रदर्शित होतील भारतीय चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बांगलादेशातील चित्रपटगृहांत लवकरच भारतीय चित्रपट प्रदर्शित होऊ शकतील. या महिन्यात बांगलादेशातून एक पथक भारताबरोबरचे संबंध मजबूत करण्यासाठी दिल्लीत येत आहे.
चर्चेत भारतीय हिंदी, बांगला, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी चित्रपट बांगलादेशात प्रदर्शित करण्यावर सहमती होण्याची पूर्ण शक्यता आहे. गेल्या ४६ वर्षांपासून बांगलादेशातही सर्व भारतीय भाषांतील चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आहे.
२०१० पासून बंदी हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वर्षी दोन्ही देशांत संयुक्त प्रकल्पांतर्गत चित्रपट बनवण्याबाबत करार झाला आहे. यात अट आहे की, चित्रपटात दोन्ही देशांचे मुख्य कलाकार असावेत, शूटिंगही अर्धी-अर्धी दोन्ही देशांत असावी. दिग्दर्शकही दोन असावेत - एक बांगलादेशाचा आणि एक भारताचा. त्यानंतरच चित्रपट दोन्ही देशांत प्रदर्शित होईल.
बातम्या आणखी आहेत...