आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष व माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचे मुंबईत निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- एकनाथ ठाकूर)
मुंबई- सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष व माजी खासदार एकनाथ ठाकूर (वय-73) यांचे आज सकाळी 11 वाजता मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. प्रभादेवी येथे राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकूर गेल्या 42 वर्षापासून कॅन्सरने ग्रस्त होते. ठाकूर यांनी नॅशनल स्कूल ऑफ बॅंकिंग या संस्थेची स्थापना करून देशातील लाखो तरूणांना एक वेगळी दिशा दिली.
ठाकूर यांचे पार्थिव उद्या प्रभादेवी येथील सारस्वत बॅंकेच्या भवनमध्ये सकाळी 11 ते 4 या वेळेत अंत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 5 वाजता त्यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. ठाकूर यांनी देशातील सर्वात मोठ्या सहकारी बॅंकेची स्थापना केली. 2002 ते 2008 या काळात ते शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यसभेत खासदार राहिले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, उद्योग व बॅंकिग क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
पुढे वाचा, मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली ठाकूर यांना श्रद्धांजली...