आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banking News In Marathi, Basal 3 Law, Reserve Bank Of India

‘बॅसल 3’ नियमांच्या अंमलबजावणीसाठी बॅँकांना मुदतवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॅँकिंग क्षेत्रासाठी रिझर्व्ह बॅँकेने ‘बॅसल 3’ या जागतिक स्तरावरील भांडवल नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मध्यवर्ती बॅँकेने 31 मार्च 2018 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. परंतु बॅँकेचा मत्ता दर्जा आणि नफ्यावर येत असलेला संभाव्य ताण लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅँकेने या नियमांच्या अंमलबजावणीला मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.


देशात बॅसल 3 भांडवलविषयक नियमांच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एक जानेवारी 2019 या आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झालेल्या तारखेच्या जवळपास पूर्ण अंमलबजावणीचा कालावधी येत असल्याचे रिझर्व्ह बॅँकेने म्हटले आहे.


बँकांच्या मत्ता दर्जावर येत असलेला संभाव्य ताण आणि पर्यायाने बँकांच्या कामगिरीवर होणारा त्याचा परिणाम लक्षात घेऊन उद्योगांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे बॅसल 3 नियमांच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेल्या अंतिम तारखेपर्यंत बँकांना भांडवल उभारणीसाठी पुरेसा वेळ देण्याची सध्या गरज असल्याचे रिझर्व्ह बॅँकेने म्हटले आहे.