आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकबुडव्या संचालकांना दहा वर्षे निवडणूक बंदी, सहकारी संस्था दुरुस्ती विधेयक मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सहकारी बँका बुडवणाऱ्या संचालकांना यापुढे दहा वर्षे निवडणूक बंदी करणाऱ्या महाराष्ट्र सहकारी संस्था दुरुस्ती विधेयकाला विधानसभेने गुुरुवारी मंजुरी दिली. मात्र या कायद्यातील प्रास्तावित तरतुदींना विरोधकांसह भाजप नेते एकनाथ खडसेंनीही विरोध केला. त्याला भविष्यात न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी भीती व्यक्त करत खडसेंनी काही सुधारणाही सुचवल्या. नुसतेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डोळ्यासमोर ठेवून हा कायदा करू नका. सहकार क्षेत्रातील अनेक बँका आपल्याही आहेत याचा विचार करा, असा घरचा आहेरही खडसेंनी सरकारला दिला. चांगले काम करणाऱ्या संचालकांनाही फटका बसणार असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...