आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीबीमुळे BAR डान्सर झाली होती ही स्क्रिप्ट रायटर, आई होती बॉलिवूड अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सचा बार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2005 मध्ये तत्कालिन सरकारने डान्सबार बंदी आणली होती. त्यानंतर हजारो बारगर्ल्सवर बेरोजगारीची वेळ आली. यामुळे काहींनी देहव्यापाराच तर काहींनी विदेशाचा मार्ग निवडला होता. या बारगर्ल्समध्ये एक मुलगी अशी होती जिने बारच्या काळ्या रात्री सोडल्या आणि हाती लेखणी घेतली आज ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर आहे. होय, आम्ही बोलत आहोत राज, आशिकी 2, वो लम्हे सारख्या चित्रपटांची पटकथा लेखिका शगुफ्ता रफीकबद्दल. कधीकाळी पैशाच्या चणचणीमुळे बार डान्सर असलेली शगुफ्ता आज चित्रपटांच्या कथा लिहून लाखो रुपये कामावत आहे.

अभिनेत्रीची मुलगी आहे शगुफ्ता
शगुफ्ता एक दत्तक मुलगी आहे, तिला अनवर बेगमच्या रुपाने आईचे छत्र मिळाले होते. 50 च्या दशकात अनवर बेगम हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री होत्या. पती मोहम्मद रफीकच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर एकानंतर एक संकटे येत गेली. जणू संकटांची मालिकाच सुरु झाली. त्यांना मुंबईतील घर आणि संपत्ती विकावी लागली. अनवर यांची मुलगी आणि शगुफ्ताची बहिणी सईदा ही देखील चित्रपटात काम करत होती. तिने चित्रपट निर्माता ब्रिज सदानासोबत लग्न केले. हा तोच ब्रिज सदाना, ज्याने एक दिवस आपल्या पत्नी आणि मुलांना गोळ्या मारून आत्महत्या केली होती. मोहम्मद रफीकच्या निधनानंतर घरात सईदाच एकमेव कमावती होती. तिच्या मृत्यूनंतर शगुफ्तावर दुःखाचा आणि संकटांचा डोंगर कोसळला.

गरीबीमुळे करत होती बारमध्ये डान्स
सईदाच्या मृत्यूनंतर शगुफ्ताची परिस्थिती अत्यंत हलाखिची झाली. तेव्हा ती अवघ्या षोडशा वयात होती. लहानपणी तिने शास्त्रीय नृत्य शिकले होते. त्यामुळे एका कौटुंबिक ओळखीच्या व्यक्तीने तिला डान्सबारमध्ये काम मिळवून दिले. ती रोज रात्री तोंडावर ओढणी बांधून डान्स करु लागली. त्यानंतर खास मैफलीत जाण्यास तिने सुरुवात केली. डान्सबार बंदी येण्याआधी तिची एका रात्रीची कमाई हजारो रुपये होत होती.
दुबईमध्ये गाणे गाण्यासाठी गेली
डान्सबार बंद झाल्यानंतर बहुतेकींनी देहव्यापाराचा मार्ग निवडला. तेव्हा शगुफ्ताने लेखनाकडे मोर्चा वळवला. तिने अनेक टीव्ही सिरियल्ससाठी लिखान केले. हिंदी आणि उर्दूवर चांगली पकड असल्यामुळे तिला कामही मिळत गेले, मात्र यातून होणारी कमाई फार जास्त नव्हती. याच दरम्यान तिच्या आईला अनवर बेगमला कँसरने ग्रासले. तेव्हा एका मित्राने तिला दुबईतील एका बारमध्ये गाणे गाण्यची ऑफर दिली, शगुफ्ताने त्याला तत्काळ होकार दिला. दुबईत भरपूर पैसा कमावल्यनंतर शगुफ्ता चित्रपटांसाठी लेखन करण्याच्या इराद्याने भारतात परत आली.
डान्सबार सोडल्यानंतर भट्ट कॅम्पशी जोडली गेली
दुबईहून परत आल्यानंतर शगुफ्ता महेश भट्ट यांच्या कंपनीत असिस्टंट डायरेक्टर झाली. हे काम करत असताना तिचा या क्षेत्राकडे असलेला ओढा आणखी वाढला आणि तिने लिखानाला अधिक वेळ देण्यास सुरुवात केली. भाषेवर आधीच पकड होती, या क्षेत्रात काम करायला लागल्यानंतर त्याचे बारकावे देखील माहित झाले. कलयूग या चित्रपटातील तिचे काम पाहून भट्ट कँम्पने तिला आणखी संधी दिली. वो लम्हे, आवारापन आणि धोखा सारख्या चित्रपट आता तिच्या नावावर जमा आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शगुफ्ता रफीकचे निवडक PHOTOS...