आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसेसने मुंबईत येत होत्या BAR GIRLS, कोट्यवधीत होती एका रात्रीची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील डान्सबारचा एक दृष्य.. फाइल फोटो - Divya Marathi
मुंबईतील डान्सबारचा एक दृष्य.. फाइल फोटो
मुंबई - सुप्रीम कोर्टाने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला ज्यामुळे महाराष्ट्रात डान्स बारवरील बंदी हटवण्यात आली आहे. कोर्टाने या निर्णयाने राज्यात लागू केलेल्या बंदील हंगामी स्थगिती दिली आहे. तर राज्य सरकारने म्हटले आहे, की बारमध्ये डान्सला परवानगी दिली तर त्यामुळे अश्लिलता वाढेल. सुप्रीम कोर्टाने संबंधित अधिकाऱ्यांना बिभस्त डान्स होत असेल तर तो रोखण्याचा अधिकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणी केली होती डान्सबार बंदी
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या कारकीर्दीत डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. ऑगस्ट 2005 मध्ये मुंबई पोलिस अधिनियम 1951 मध्ये सुधारणा करून राज्य सरकारने हा निर्णय राज्यभरात लागू केला आणि एकट्या मुंबईतील 700 डान्सबार आणि राज्यभरातले साधारण 650 डान्सबार एका झटक्यात बंद करून दाखवण्याची किमया करून दाखवली.

दीडलाख झाले होते बेरोजगार
महाराष्ट्रात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात 2005 मध्ये डान्सबार बंदी घालण्यात आली होती. यामुळे दीडलाख लोकांवर बेरोजगारीची वेळ आली होती. त्यात 70 हजारांच्या आसपास महिला होत्या. त्यानंतर मुंबईत अनैतिक धंद्यात वाढ झाली होती. बेरोजगार झालेल्या बारबालांनी नंतर देशातील इतर राज्यांमध्ये मोर्चा वळवला होता. देशातील अनेक राज्यांमध्ये सेक्स रॅकेटवरील छाप्यात मुंबईच्या बारबाला पकडल्या जात होत्या. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी बेरोजगारीमुळे या धंद्यात आल्याचे अनेकवेळा सांगितले आहे.

गर्ल्स बसेसने येत होत्या बारमध्ये
अशी माहिती आहे, की बारगर्ल्सला बारपर्यंत येण्या-जाण्यासाठी स्पेशल बसेस राहात होत्या. मुंबईच्या उपनगरांतून शेकडो बसेस बारगर्ल्सला घेऊन मुंबईत येत असत आणि नंतर पुन्हा त्यांना नेऊन सोडत होत्या. काही हायप्रोफाइल बारगर्ल्स या टॅक्सीने देखील येत असत. त्यावेळी मुंबईत प्रत्येक रात्री कोट्यवधी रुपयांची त्यांची कमाई होत होती.
मुंबईतील सर्वात पहिला डान्सबार बेवॉच
डान्सबारचे कल्चर मुंबईत सुरु झाले ते 1980 च्या दशकात. पण ते फार मोजक्या ठिकाणी होते. जसे की 80 मध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे डान्सबार होता. त्यानंतर मुंबईत बेवॉच नावाने पहिला डान्सबार सुरु झाला. त्यानंतर हे कल्चर मुंबईत फोफावत गेले. अशी माहिती आहे, की हजारांच्या घरात बारगर्ल्स मुंबईत डान्स करण्यासाठी येत होत्या.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुंबईच्या बारबालांचे आणखी फोटोज्...