आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रज्ञांनी बनवले समुद्राचे पाणी गोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशभरात पिण्याच्या पाण्याचे संकट घोंगावत असताना एक चांगली बातमी आहे. भाभा अॉटोमिक रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी समुद्रातील खारे पाणी पिण्यायोग्य बनवल्याचा दावा केला आहे. या माध्यमातून प्रतिदिन सुमारे ६३ लाख लिटर पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य करता येईल, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. तामिळनाडू येथील कलपक्कम येथे हा प्रकल्प सुरू केला आहे. अणुकेंद्रातून निघणाऱ्या वाफेच्या आधारे खारे पाणी शुद्ध करण्यात येते.
बीएआरसीचे व्यवस्थापक के. एन. व्यास म्हणाले, पंजाब, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथे असे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. युरेनियम व आर्सेनिकयुक्त पाण्यालाही पिण्यायोग्य बनवता येईल, अशीही यंत्रणा आहे.
बातम्या आणखी आहेत...