आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बर्फी’ला सहा फिल्मफेअर पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणबीर कपूर, प्रियंका चोप्रा आणि इलिना डिक्रुज यांच्या दर्जेदार अभिनयाने सजलेल्या ‘बर्फी’ या चित्रपटाने बॉलीवूडसाठी प्रतिष्ठित समजल्या जाणा-या फिल्मफेअरमध्ये सहा पुरस्कार पटकावून दिग्दर्शक अनुराग बसूला अनोखी भेट दिली. ‘बर्फी’ पाठोपाठ विद्या बालनच्या ‘कहानी’ या चित्रपटानेही पाच पुरस्कार पटकावले.

58 व्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा मुंबईतील अंधेरी येथील वायआरएफ स्टुडिओत रविवारी रात्री करण्यात आली. सोहळ्यात बर्फीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासह एकूण सहा पुरस्कार पटकावले. यात इलिना डिक्रुजला पदार्पणातील नवोदित अभिनेत्री, संगीतासाठी प्रीतमला दोन तर दर्जेदार चित्रपटाचा सन्मानही बर्फीला मिळाला. ‘कहानी’ चित्रपटातील भूमिकेसाठी विद्या बालनची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. तर याच चित्रपटाचा दिग्दर्शक सुजॉय घोष याला सर्वोत्कृष्ट दिग्दशर्काचा पुरस्कार मिळाला.

इरफान खानला ‘पानसिंग तोमर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कार मिळाला. ‘जब तक है जान’साठी अनुष्का शर्माला सहअभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय चित्रपटाचे शतक महोत्सवी वर्ष असल्याने पुरस्कार विजेत्यांना या वेळी विशेषट्रॉफी प्रदान करण्यात आली.

शाहरुख आणि सैफ अली खान यांच्या सूत्रसंचालनाने सोहळ्यात रंग भरले. बॉलीवूडमधील बहुतेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, यात पतीसोबत उपस्थित राहून अभिनेत्री विद्या बालनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.