Home »Maharashtra »Mumbai» Battery Spot On Police Vehicle In Kurla

कुर्ल्यात पोलिसांच्या गाडीत बॅटरीचा स्फोट; पाच महिला कॉन्स्टेबल जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 17:05 PM IST

  • कुर्ल्यात पोलिसांच्या गाडीत बॅटरीचा स्फोट; पाच महिला कॉन्स्टेबल जखमी

मुंबई- विविध कामगार संघटनांच्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या गाडीत बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्फोटात पाच महिला कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कुर्ल्यातील विनोबा भावे नगरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. भारत बंद दरम्यान पोलिस बंदोबस्तासाठी जात होते. अचानक गाडीत बॅटरीचा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तीशाली होता ही पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Next Article

Recommended