आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे, सुनील तटकरे यांच्यात जोरदार खडाजंगी, जलयुक्त शिवारच्या लक्षवेधीवर झाला वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जलयुक्त शिवार योजना रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवत नसल्याबाबत विचारणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सुनील तटकरे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यामध्ये सोमवारी विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. जिल्हाधिकारी भेटत नसल्याची तक्रार तटकरेंनी केली असता, तुम्ही अधिकाऱ्यांकडे जा, असा सल्ला पंकजांनी दिल्यामुळे संतप्त झालेले शेकाप सदस्य भाई जयंत पाटील यांनीही पंकजा मुंडे यांना खडे बोल सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य प्रकाश बिनसाळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी तटकरेंनी रायगड जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी केवळ ४५ गावांची निवड केली असल्याची माहिती दिली. या योजनेचे निकष काय, तसेच या योजनेंर्गत झालेली कामे निकृृष्ट असून या जिल्ह्यातील कामे ठेकेदारांच्या हितासाठी केल्याचा आरोप तटकरेंनी केला.
त्यावर टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये ही योजना राबवली जाते, असे पंकजा मुंडेंनी सांगितले. परंतु रायगड जिल्ह्यामध्ये टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात नाही, याचा अर्थ आमच्या जिल्ह्यात ही योजना राबवयची नाही का, असा सवाल तटकरेंनी केला.
आपण तीस वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहोत. काही योजनांचे आम्ही पण जनक आहोत. आपणच योजना सुरू केल्याच्या भ्रमात राहू नका, असे खडे बोल तटकरेंनी पंकजा यांना सुनावले. यानंतर तटकरेंनी कोणाचा अनादर करण्यासाठी आपण बोललो नसल्याचे स्पष्ट केले.

पुढील स्लाईडवर वाचा, संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट हे पंकजा मुंडे यांच्या मदतीला आले....