आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यामुळे झाले बलाढ्य मराठी सत्तेचे "पानीपत", एक छोटीशी चुक पडली महागात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- पानीपतचे युध्‍द ही एक अशी ऐतिहासिक घटना आहे, जी महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती विसरू शकत नाही. आजही हरियाणातील पानीपत येथे या युध्‍दाचे पुरावे सापडतात. या लढाईत मराठी सत्तेचा सपशेल पराभव झाल्‍यामुळे ''पानीपत झाले'' ही म्‍हण मराठी संस्कृतीत रुजली. या युद्धात जवान शहिद झाला नसेल असे महाराष्ट्रातील एकही शहर किंवा गाव नसेल. भारतीय इतिहासामध्‍ये जी सत्‍तांतरे झाली त्‍यामध्‍ये पनीपतची लढाई हा एक महत्त्वाचा अध्‍याय आहे.

14 जानेवारी 1761 मध्ये अफगाणिस्तानचा राजा अहमदशहा अब्‍दाली मोठा फौज-फाटा घेऊन भारतात आला. हे आक्रमण थोपवण्‍यासाठी सदाशिवराव भाऊ यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली मोठे मराठी लष्कर पाठविण्यात आले होते. या दोन लष्करांत तुंबळ युद्ध झाले. लाखो सैनिक मृत्युमुखी पडले. त्यात मराठी बांधवांची संख्या जास्त होती.

पुढील स्‍लाईडवर वाचा कसे घडले पानिपत युद्ध, मराठी सत्तेच्या पराभवाची कारणे....