आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Battle Over Chikki, Biscuit Among Pankaja Dhananjay Munde

चिक्की, बिस्कीटावरून पंकजा -धनंजयमध्‍ये संघर्ष ! सूर्यकांता संस्थेला ठेका देण्याचा वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निकृष्ट चिक्की खरेदीचा प्रश्न दोनवेळा पुढे ढकलण्यात आला हाेता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी परत तो चर्चेला आला. ती संधी साधत विरोधकांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सर्व प्रश्नांना सफाईने उत्तरे देत पंकजा यांनी विरोधकांचे हल्ले परतवून लावले खरे, परंतु त्यांचे बंधू अाणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी चर्चेच्या अनुषंगाने झालेली प्रश्नोत्तरांची जुगलबंदी विधान परिषदेने पुन्हा अनुभवली. तसेच पाच कोटी रुपयांच्या बिस्कीट खरेदीच्या मुद्द्यावरूनही या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

काँग्रेसचे संजय दत्त यांनी चिक्कीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सरकारने न्यायालयात ‘सूर्यकांता’ची चिक्की खाण्यालायक नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा दावा दत्त यांनी केला. त्यावर पंकजा यांनी ‘चिक्कीचे १२ नमुने तपासले. त्यातील एका नमुन्यात ०.०३८ टक्के अयोग्य घटक आढळले असून प्रयोगशाळेत ‘सूर्यकांता’च्या चिक्कीत काहीही वावगे आढळले नाही,’ असे सांगितले. प्रयोगशाळेच्या अहवालात मतभिन्नता आहे, म्हणून या अहवालांचीच चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर पंकजा यांनी ‘प्रयोगशाळेच्या अहवालावर विरोधी पक्षनेत्यांचाच विश्वास नाही, तर मी काय बोलणार?’ असा टोला लगावला. सूर्यकांता ही परिशिष्ट पाच मधली संस्था आहे. त्यामुळे चिक्कीचे उत्पादन याच संस्थेने करणे अपेक्षित होते. मात्र या संस्थेची स्थिती पाहता २९ लाख किलो चिक्की अल्पकाळात कशी बनवली, असा सवाल विचारण्यात अाला. त्यावर ‘यापूर्वीच्या सरकारने सूर्यकांताची ३० कोटीची चिक्की खरेदी केली होती. तेव्हा हा प्रश्न विचारला गेला नाही?’, असा प्रतिप्रश्न पंकजा यांनी धनंजय यांनाच केला. काँग्रेसच्या शरद रणपिसे यांनी चिक्कीची खरेदी २६६ कोटींची असून सदर खरेदी रूल ऑफ बिझनेसप्रमाणे झाली नसल्याचा दावा केला. त्यावर पंकजा यांनी चिक्की खरेदी १२० कोटींची असून ती नियमानेच झाल्याचे ठामपणे सांगितले.

पुढे वाचा.. सभापतींच्या मध्यस्थीने वादावर पडदा