आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मात्याच्या कुटुंबीयांना मांसाहार केल्याने मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-साेसायटीत बंदी असतानाही घरी मांसाहारी जेवण शिजवल्याच्या कारणावरून मुंबईतील दहिसर भागातील बाेना व्हेन्चर इमारतीतील रहिवाशांनी प्रसिद्ध नाटक निर्माते गाेविंद चव्हाण यांच्या पत्नी व मुलीला मारहाण केली. हा सर्व प्रकार इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यावरून पाेलिसांनी मारहाण करणाऱ्या २० जणांना ताब्यात
घेतले अाहे.

मांसाहारी लाेकांना साेसायटीत जागा न देण्याचे प्रकार मुंबईतील गुजराती, जैन समाजाच्या साेसायट्यांमध्ये वारंवार घडत असल्याच्या तक्रारी अनेकदा अाल्या हाेत्या. अाता चव्हाण यांच्यासारख्या प्रतिष्ठित निर्मात्याच्या बाबतीतच असा अमानुष प्रकार घडल्याने ‘शाकाहरी-मांसाहरी’ वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर अाला अाहे. विशेष म्हणजे चव्हाण घरी नसताना त्यांच्या शेजाऱ्यांनी पत्नी व मुलीला मारहाण केली अाहे.

चव्हाण यांची कन्या सुप्रिया हिने फेसबुकवरून या प्रकरणाला वाचा फोडली आहे. त्याचप्रमाणे चव्हाण कुटुंबीयांना मारहाण होत असतानाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजही तिने शेअर केले आहे. ही इमारत व येथील साेसायटीही अनधिकृत असल्याचे तिचे म्हणणे अाहे. दरम्यान, चाैकशीसाठी पाेलिस अाले असता साेसायटीतील रहिवाशांनी चव्हाण हे आपल्या घरासमोर अंडी आणि घाणेरडे पाणी टाकत असल्याची तक्रार केली.
बातम्या आणखी आहेत...