Home »Maharashtra »Mumbai» Because Of Disappointment Aditya Lose Leadership

नाराजीमुळे हुकले आदित्यचे नेतेपद?

प्रतिनिधी | Jan 26, 2013, 07:39 AM IST

  • नाराजीमुळे हुकले आदित्यचे नेतेपद?

मुंबई- शिवसेनेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड होणार हे जसे नक्की होते तसेच त्यांचे पुत्र व युवा सेनेचे प्रमुख आदित्य यांचीही नेतेपदी निवड करण्याचे निश्चित झाले होते. मात्र शिवसैनिकांत असलेली धुसफूस आणि नाराजी लक्षात घेता व घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी आदित्य यांची निवड झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
उद्धव यांना पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्षपद देऊन आदित्य यांनाही नेतेपद देण्याचे ठरवले होते. मात्र शिवसेनेत सध्या सुरू असलेली धुसफूस आणि नातलगांची वर्णी लागत असल्याचा आरोप टाळण्यासाठी खुद्द उद्धव यांनीच ही निवड लांबणीवर टाकल्याचे सांगितले जाते. मात्र युवा सेनेला अंगीकृत संघटना असल्याचा ठराव करून आदित्य यांना मुख्य प्रवाहात आणले.

नार्वेकरही चर्चेत :आदित्य यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांचेही नाव नेतेपदासाठी निश्चित झाले होते. परंतु आदित्यसाठी जागा रिकामी करण्याची कोणत्याही नेत्याची तयारी नव्हती. मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या जागी तुलनेने ‘ज्युनियर’ असलेल्या आदित्यची निवड केल्यास नाराज अधिक वाढेल, या भीतीपोटी दोघांच्याही नावाचा प्रस्तावच रद्द करण्यात आला.

विक्रम अबाधितच
राज ठाकरे यांच्यावर वयाच्या 21 व्या वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेची तर 29 व्या वर्षी शिवसेना नेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर तरुणांना आकर्षित करण्यासाठी बाळासाहेबांनीच आदित्य ठाकरे यांच्यावर 2010 मध्ये युवा सेनेची जबाबदारी सोपवली. आदित्यचे वय तेव्हा 21 होते. त्यामुळे शिवसेना नेतेपदी विराजमान होताना काकाचा विक्रम मोडण्याची आदित्य यांना संधी होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.

Next Article

Recommended