आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धवने मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडली; राज मात्र चुकले- मनोहर जोशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एकीसाठी प्रयत्नशील दिसत असलेले शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राज ठाकरेंच्या विरोधात पहिल्यांदाच उघडपणे टीप्पणी केली आहे.

जोशी गुरुवारी नाशिकमध्ये होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राजमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाची भूमिका निभावत राज यांच्याबाबत औदर्य दाखवले होते. मात्र राज ठाकरे यांनी छोट्या भावाप्रमाणे व्यवहार केला नाही. मनसेसोबत युती करण्याच्या उद्धव यांच्या प्रस्तावाची राजने खिल्ली उडवायला नको होती. उद्धव यांच्या युतीच्या प्रस्तावाची तुलना विवाहाच्या जाहीरातीबरोबर करुन खूप चुकीचे केले आहे. राज ठाकरे व मनसेने भविष्यात अशा प्रकारची भूमिका राहिली तर, शिवसेनाही मनसेशी विरोधी पक्षाच्या न्यायाने वागेल. लोकसभेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या जोशी यांनी राज यांच्याविरोधात प्रथमच असे जाहीर वक्तव्य केले आहे.

राज आणि मनोहर जोशी यांच्यात जवळीक असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे जोशी यांचे पक्षातील वजन व महत्त्व कमी केल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे उद्धव यांनी जोशी यांच्याऐवजी मुंबईतील सेनेचे नेते अनिल देसाई यांना राज्यसभेवर पाठवले होते. मात्र, आता अचानकपणे जोशी यांनी उद्धव यांची बाजू घेत राज यांना उघडपणे धारेवर का धरले, असा सवाल आता उपस्थित केला जावू लागला आहे.