आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडच्या महिला पाेलिसाला ‘मॅट’कडे जाण्याचे निर्देश; रजेबाबत मुंबई हायकोर्टाचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लिंग बदलाची परवानगी मागण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांना या शस्त्रक्रियेसाठी रजेबाबत महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.   

 
ललिता यांनी लिंगबदलासाठी रजा मिळावी असा अर्ज पोलिस महासंचालकांकडे केला होता. परंतु नियमाप्रमाणे अशी रजा देता येत नाही, असा पवित्रा  महासंचालकांनी घेतला. याबाबत सकारात्मक विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासंचालकांना दिले होते.


दरम्यान, ललिता  यांनी यांनी गेल्या आठवड्यात हायकोर्टातही याचिका दाखल केली होती. साेमवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी झाली. हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडित असल्याने याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी मॅटमध्ये दाद मागावी, असे कोर्टाने स्पष्ट केले.

 

काय आहे महिला पोलिस कॉन्स्टेबल लिंगबदल प्रकरण?

- ललिता साळवे 2009 मध्ये पोलिस दलात रुजू झाल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या शरीरात बदल होत गेला आणि आपले मानसिक वर्तन पुरुषांप्रमाणे होत असल्याचे जाणवले.

- बीडमधील डॉक्टरांच्या सल्ल्यांनंतर त्यांनी वैद्यकीय चाचणी करून घेतली आणि त्यावेळी त्यांच्या शरीरात पुरुषीय जनुके असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लिंगबदलाचा विचार त्या करू लागल्या.

- मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शारीरिक चाचणी करून घेतानाच त्यांनी समुपदेशनही घेतले. तेथील डॉक्टरांनी त्यांना लिंगबदलाचा विचार योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे ललिता यांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

- बीडच्या पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे ललिता हिने शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याच्या रजेचा अर्ज केला. शस्त्रक्रियेनंतर पुरुष कॉन्स्टेबल म्हणून पोलिस सेवेत कायम राहण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

- एसपी श्रीधर यांनी ललिताचा अर्ज डीजीपी सतीश माथुर यांच्याकडे पाठवला. माथुर यांनी ललिता यांच्या संपर्क केला. यावेळी ललिता यांनी जेजे हॉस्पिटलमध्ये लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुटी मागितली होती. परंतु, पोलिस भर्तीचे नियम सांगत ललिता हिची मागणी पोलिस खात्याने फेटाळली.

- त्यामुळे आता त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. ललिता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मॅटमध्ये दाद मागा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

 

मुख्यमंत्र्याने दिले मदतीचे आश्वासन

- मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी पीडित ललिता साळवे यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
- डीजीपी सतीश माथुर यांना ललिता यांचा सुटीचा अर्जही मंजूर करण्‍याचे आदेश दिले आहेत.

- माजलगाव तालुक्यातील तिच्या गावापाठोपाठ महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना व कार्यकर्ते तिच्या मागणीच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत.

 

यापूर्वीही समोर आल्या होत्या अशा घटना...
- लिंगबदलाची मागणी करणारी ललिता साळवे ही भारतात एकमेव महिला नाही. काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलात सेलर मनीष कुमार गिरी यांनी लिंग बदलले होते. परंतु त्यानंतर त्याला नोकरी गमवावी लागली होती. मनीष आता सबी गिरी बनला आहे. परंतु, ललिता यांना लिंगबदल करून पोलिससेवेत कायम राहायचे आहे. लिंगबदलासाठी त्यांनी पोलिस खाते तसेच कोर्टाकडे कायदेशिर अर्ज केला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून भेटा... ललिता साळवे हिच्यासारख्या इतर लोकांना...

बातम्या आणखी आहेत...