आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिंगबदलानंतरही कॉन्स्टेबल महिला नोकरीमध्ये राहणार! मुख्यमंत्र्यांचे निर्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजलगावात कार्यरत कॉन्स्टेबल ललिता साळवे यांना लिंगबदलाची परवानगी देताना नोकरीतही समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिस महासंचालक सतीश माथुर यांना दिले. यामुळे लिंगबदलानंतरही नोकरीत राहण्याचा साळवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 


महिला श्रेणीत निवड झाल्याने लिंगबदलानंतर साळवे यांना नोकरीत ठेवता येणार नाही असे पोलिस महासंचालकांचे म्हणणे होते. विनंती फेटाळल्यानंतर साळवेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. ही माहिती मुख्यमंत्र्यांना कळताच त्यांनी वादावर तोडगा काढावा, असे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले. 

 

काय आहे प्रकरण?
माजलगाव शहर ठाण्यात कार्यरत ललिता साळवे यांनी आपल्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल होत असल्याचे जाणवू लागल्यावर लिंगबदलाचा निर्णय घेतला होता. २३ जूनला तिची जेजे रुग्णालयात हार्मोन्सची चाचणी झाली होती. मात्र, लिंगबदलाच्या निर्णयानंतर तिच्या नोकरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...