आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का, राष्ट्रवादीचे नगरपंचायतीत घवघवीत यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळवले आहे. माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने यश मिळवल्याने भाजपला धक्का बसला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना यानिमित्ताने शह दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीडमधील जनतेने सहानभूतीच्या राजकारणाला मुठमाती दिली असून या पुढे विकासाचे राजकारण करा असा संदेश दिला आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवेंच्या जालना जिल्ह्यातल्या बहुतेक नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादीलाच बहुमत मिळाले आहे. तर नागपूरमध्येही मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या मतदारसंघातील मंडणगडमध्ये 17 पैकी 16 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. भाजप- शिवसेनेच्या सरकारच्या वर्षभरातल्या कामगिरीबद्दल जनतेच्या मनात असलेली नाराजीच या निकालांतून व्यक्त झाली असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. याचबरोबर आज झालेल्या राज्यातील नगर पंचायत व ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचे तटकरेंनी माहिती दिली.
सोशल मीडियावर शिवसेना विरुद्ध भाजप, सेनेच्या व्यंगचित्रांना आशिष शेलार यांचं उत्तर, पाहा पुढे...