आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडच्या आदित्य पॉलिटेक्निकची चौकशी होणार : मोघे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बीडच्या आदित्य आणि मिठ्ठालालजी सारडा पॉलिटेक्निक कॉलेजांतील शिष्यवृत्ती घोटाळ्यांची विभागीय चौकशी करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

आमदार विनायक मेटे, राजेंद्र जैन आणि सुभाष चव्हाण यांनी यावर लक्षवेधी उपस्थित केली होती. दोन्ही महाविद्यालयांनी मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या बोगस दाखवली असून केंद्र शासनाकडून मिळणा-या शिष्यवृत्तीत कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. त्यावर मोघे यांनी महाविद्यालयांची समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले.