आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Discussing With Congress Nationalist Summon Meeting For Lok Sabha Seats

लोकसभेच्या जागावाटपासाठी कॉंग्रेसशी चर्चेपूर्वी राष्‍ट्रवादीची पुन्हा बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासाठी कॉँग्रेस-राष्‍ट्रवादीत येत्या आठवडाभरात चर्चा होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राष्‍ट्रवादीने आता चर्चेच्या तोंडावर आपले पेपर वर्क पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुन्हा महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे दिल्लीतून परतल्यानंतर लगेचच म्हणजे मंगळवार किंवा बुधवारी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीने उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याला प्राधान्य दिले आहे.
बीड, नगरचा उमेदवार आजच ठरणार
मावळ, शिरूर, नगर दक्षिण, रावेर, जळगाव, परभणी आणि बीड या सात जागांवर कोण निवडणूक लढवणार याबाबत अजून निर्णय झालेला नाही. एकापेक्षा जास्त नावे या जागांवर शर्यतीत आहेत. काही उमेदवारांच्या नावांसाठी अजित पवार यांनी हट्ट धरला आहे, तर काही नावांना शरद पवारांची पसंती आहे. उद्या होणा-या बैठकीत या सात जागांवर चर्चा होऊन अंतिम नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच काँग्रेसबरोबर ज्या जागांची अदलाबदल करायची आहे त्याबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा उद्याच्या बैठकीत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.