आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Eknath Khadse Nationalist Congress Not Speak

\'एकनाथी भारुडा\'समोर राष्ट्रवादी काँग्रेस निष्प्रभ, पवारांवरील टीकेवर हास्यकल्लोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'प्रेमसंबंधांमुळे शेतकरी आत्महत्या करतात', असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना ५ वेळा संसदीय प्रश्नोत्तरांमधे दिले होते, याचा वारंवार पुनरोच्चार करुन राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची कोंडी केली.'राष्ट्रवादी काँग्रेस'कडून उपस्थित होणा-या प्रत्येक प्रश्नावर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या संसदेतील उत्तराचा उल्लेख केल्याने सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले. काँग्रेसच्या सदस्यांनीही 'राष्ट्रवादी'च्या कोंडीचा हसून आनंद घेतला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या शेतकरी आत्महत्यांसंदर्भात संसदेत केलेल्या वक्तव्याबाबत राज्य सरकारची काय भूमिका आहे, सरकार 'त्यांच्या' मताशी सहमत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा कृषिमंत्री एकनाथ खडसे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे विखे यांच्या प्रश्नानंतर कामकाज सुरू झाले. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर चर्चा सुरू झाली. दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून लोकसभा व राज्यसभेत दिलेल्या उत्तरांची पत्रके सदनात सदस्यांना वाटण्यात आली. यावर 'राष्ट्रवादी' सदस्यांनी आक्षेप नोंदवला. विधानसभा अध्यक्षांची अनुमती घेऊन ही पत्रके वाटली आहेत का ?, असा प्रश्न विचारण्यात आला.

"सभागृहात कोणत्याही प्रकारचे पत्रक अध्यक्षांच्या परवानगीशिवाय वाटता येत नाहीत. लोकसभेत काय झाले याची माहिती विधानसभेत काढण्याचे काय कारण,' असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यावर खडसे यांनी पत्रक काय आहे हे "राष्ट्रवादी'च्या सदस्यांनी वाचून दाखवावे अशी विनंती केली. त्यावरून 'राष्ट्रवादी'च्या सदस्यांची बोलती बंद झाली.
शेतकरी आत्महत्या का होतात, या प्रश्नावर माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी संसदेत दिलेल्या उत्तराचा तपशील त्या पत्रकांमधे असल्याने ते वाचण्याचे धाडस "राष्ट्रवादी'कडून झाले नाही. शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असल्याच्या अनेक कारणांपैकी "प्रेमसंबंध' हे एक कारण असल्याचे पवार यांच्या उत्तरात नमूद करण्यात आले होते.

पुढे वाचा... 'त्यावेळी' मान्य होते का?