आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before The Printing Handwritten Book Uploaded On Website, School Education Department Decision

पाठ्यपुस्तके छापण्यापूर्वी त्याचे हस्तलिखित संकेतस्थळावर, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात पाठ्यपुस्तके वादाची कारण बनत आहेत. चुकीच्या नकाशांमुळे इतिहास आणि भूगोलाची पाठ्यपुस्तके मागे घेण्याची वेळ शासनावर ओढावली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तके छापण्यापूर्वी त्याचे हस्तलिखित संकेतस्थळावर टाकण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. चार महिन्यांपूर्वी 10 वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अरुणाचलचा भाग चीनमध्ये दाखवण्यात आला होता. त्यामुळे मोठा गोंधळ उडला होता. चौफेर टीका झाल्यानंतर शासनाने सदर पुस्तक मागे घेतले होते. तसेच ज्या अभ्यासमंडळाने या पुस्तकाचे हस्तलिखित बनवले होते. ते तातडीने बरखास्त करण्यात आले होते.
दहा वर्षांनी अभ्यासक्रमाची पुर्नरचना करण्यात येते. अभ्यासक्रम कसा असावा याची चौकट ठरलेली असते. मात्र, तज्ज्ञांची अभ्यासमंडळे नेमून पाठ्यपुस्तकांची बनवली जातात. पाठ्यपुस्तकांतील चुका आणि त्यावरील आक्षेप टाळण्यासाठी यापुढे पाठ्यपुस्तके छापण्यापूर्वी ती संकेतस्थळावर टाकण्यात येतील. त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात येईल. आलेल्या आक्षेप आणि चुकांचे निवारण करण्यात येईल.