आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला सेलिब्रिटी असल्यानेच विरोध झाला, वडील सलीम खान यांची 'दिव्य मराठी'ला माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अनेकांनी त्या विरोधात आवाज उठवला. सलमान खाननेही काही बालिशपणा करत ट्विट केले. सलमान मुस्लिम असल्यामुळे नव्हे तर तो सलमान सेलेब्रिटी असल्यानेच त्याच्या वक्तव्याचा विरोध झाला, असे मत प्रख्यात लेखक आणि सलमानचे वडील सलीम खान यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.
सलमान खानने याकूब मेमनच्या फाशीबाबत अनेक ट्विट करत याकूबऐवजी टाइगर मेमनला पकडून त्याला फाशी दिली पाहिजे, असे म्हटले होते. त्यावरून भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्या घरासमोर निदर्शने केली. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही सलमानच्या वक्तव्याचा निषेध करत त्याने असे बोलावयास नको होते, असे म्हटले होते. सलमानच्या विरोधात संपूर्ण भारतभरात निदर्शने झाली होती. सलमान खानच्या ट्विटनंतर त्याच्या वडिलांनी सलीम खान यांनी त्याला त्याच्या ट्विटच्या गंभीरतेची जाणीव करून दिल्यानंतर सलमानने आपले सर्व ट्विट मागे घेतले होते.

या संपूर्ण प्रकरणाबाबत सलीम खान यांनी प्रथमच "दिव्य मराठी'शी बोलताना प्रतिक्रिया दिली. सलमान मुस्लिम असल्यानेच त्याच्याविरोधात निदर्शने झाली का विचारता सलीम खान म्हणाले, मुळीच नाही. याकूबच्या फाशीच्या निर्णयानंतर अनेकांनी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात वक्तव्ये केली होती. त्याबाबत कोणी काहीही म्हटले नाही वा त्यांच्या विरोधात निदर्शने केली नाही. फक्त सलमानच्या वक्तव्यावरून निदर्शने केली. याचे कारण एवढेच की सलमान सेलिब्रिटी आहे. त्याच्याविरोधात निदर्शने केल्याने चांगली प्रसिद्धी मिळते हे पाहूनच निदर्शने करण्यात आली. सलमानने चूक केली आणि त्याने आपली चूक दुरुस्तही केली होती, असेही सलीम खान म्हणाले.