आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५८ दिवसांनंतर जान्हवीला जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मद्यधुंद अवस्थेत ऑडी कारने दोन जणांना चिरडणारी वकील जान्हवी गडकर हिला तब्बल ५८ दिवसांनंतर मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी तीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यापूर्वी कुर्ला महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळला होता.

जान्हवीने ९ जूनच्या रात्री एका टॅक्सीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. अपघाताच्या वेळी जान्हवी प्रमाणापेक्षा जास्त दारू प्यायली होती. त्यामुळे तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद आहे. तपास यंत्रणेला गरज भासेल तेव्हा हजर राहावे तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाता येणार नाही, अशा अटींवर तिचा जामीन मंजूर करण्यात आला.